Rashmi Shukla : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा, 1 एप्रिलपर्यंत कारवाई टळली
आयपीएस रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आज अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना 1 एप्रिलपर्यंत दिलासा दिला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणात यापूर्वी पुणे बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्याविरोधात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये दाखल एफआयआर रद्द करण्यात यावा या मागणीकरीता रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालया (Mumbai High Court)त धाव घेतली आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. रश्मी शुक्ला यांना 1 एप्रिलपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला असून त्यांच्यावर कुठलीही कठोर कारवाई करण्यात येऊ नये असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे शुक्ला यांना तूर्तास अटकेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र आज झालेल्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांना तपासामध्ये सहकार्य करण्याकरीता निर्देश दिले असून 16 मार्च आणि 23 मार्च रोजी कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये सकाळी 11 वाजता चौकशीला संबंधित अधिकाऱ्यां समोर उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. (Mumbai High Court grants relief to IPS officer Rashmi Shukla in phone tapping case)
पुणे आणि कुलाबा येथील दोन्ही गुन्ह्यांसंदर्भात सुनावणी 1 एप्रिल रोजी
आयपीएस रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आज अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना 1 एप्रिलपर्यंत दिलासा दिला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणात यापूर्वी पुणे बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या तक्रारी विरोधात रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यात त्यांना 25 मार्चपर्यंत दिलासा न्यायालयाकडून मिळाला आहे. मात्र आज मुंबई उच्च न्यायालयाने पुणे आणि कुलाबा येथील दोन्ही गुन्हे संदर्भात दाखल याचिकेवरील सुनावणी एकत्र करून 1 एप्रिल रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.
रश्मी शुक्ला यांना चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश
राज्य सरकारतर्फे रश्मी शुक्ला यांना दिलासा देण्याचा विरोध करत सरकारी वकील यांनी आरोप केला की, पुण्यात दाखल गुन्ह्या प्रकरणात न्यायालयाने दिलासा दिला असून त्या प्रकरणात रश्मी शुक्ला तपासात सहकार्य करत नाही. मात्र दुसऱ्या गुन्ह्यात दिलासा देण्यात येऊ नये. त्यावर न्यायालयाने कुलाबा प्रकरणात तपासाची तारीख 16 मार्च आणि 23 मार्च निश्चित केली आहे आणि रश्मी शुक्ला यांना चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. (Mumbai High Court grants relief to IPS officer Rashmi Shukla in phone tapping case)
इतर बातम्या
Thane Crime : बनावट दारूच्या बॉटलचे झाकण बनवणाऱ्या कंपन्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
Jammu-Kashmir : काश्मिर खोर्यात दहशतवाद्यांचा उच्छाद सुरूच; आणखी एका सरपंचाची हत्या