VIDEO | मुंबईत भररस्त्यावर वकिलावर तलवारीचे वार, हल्ल्याची दृश्यं कॅमेरात कैद

तलवार हल्ल्यात सत्यदेव जोशी गंभीर जखमी झाले आहेत. 8 जुलै रोजी बोरिवली पश्चिम भागात ही घटना घडली होती. एमएचबी पोलिसांनी या प्रकरणी तिघा आरोपींना अटक केली आहे

VIDEO | मुंबईत भररस्त्यावर वकिलावर तलवारीचे वार, हल्ल्याची दृश्यं कॅमेरात कैद
मुंबईत वकिलावर तलवार हल्ला
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 12:46 PM

मुंबई : मुंबईत एका वकिलावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. बोरिवली भागात मारहाण करुन सत्यदेव जोशी यांच्यावर तलवारीने वार करण्यात आले. ही घटना मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी तिघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. वकिलावरील हल्ल्याची एकाच दिवसात दुसरी घटना समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

तलवार हल्ल्यात सत्यदेव जोशी गंभीर जखमी झाले आहेत. 8 जुलै रोजी बोरिवली पश्चिम भागात ही घटना घडली होती. एमएचबी पोलिसांनी या प्रकरणी तिघा आरोपींना अटक केली आहे. कलम 307, 326,324, 504 आणि 506 अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. वकिलावर झालेल्या तलवार हल्ल्याची दृश्य मोबाईल कॅमेरात रेकॉर्ड झाली आहेत.

हल्ल्याची दृश्यं :

उस्मानाबादेत डॉक्टरचा वकिलावर हल्ला

दुसरीकडे, न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यामधील वकीलपत्र सोडून दे, अन्यथा जीव घेऊ, अशी धमकी देत उस्मानाबादमध्ये वकिलावर डॉक्टरने जीवघेणा हल्ला केला. वकील प्रथमेश मोहिते यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्या प्रकरणी डॉ अरुण मोरे यांच्यासह 3 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मोहिते हे डॉ. मोरेंचे मेहुणे असल्याची माहिती आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ मोरे आणि त्यांचे 2 साथीदार हल्लेखोर फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. वकिलावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी उस्मानाबाद येथील वकील संघटनेने या घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या :

बहिणीला मारहाण करणाऱ्या भाऊजींशी झटापट, चाकू खुपसून मेहुण्याने जीव घेतला

डॉक्टर दाम्पत्याच्या घटस्फोटाचा खटला, वकील मेव्हण्यावर जीवघेणा हल्ला, डॉक्टर पतीसह तिघे पसार

(Mumbai Lawyer attacked by sword at Borivali Dahisar in Daylight)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.