रिक्षावाल्याशी वाकडं, थेट नदीवर लाकडं! थरारक हत्याकांडाने गोरेगाव हादरलं
रिक्षावाल्यांना टोमणे मारत असाल तर खबरदार! मुंबईच्या गोरेगावमधील खळबळजनक घटना
मुंबई : मुंबईत रिक्षा (Mumbai Auto Rikshaw) वाल्यांसोबत प्रवाशांची भांडण होणं, ही सामान्य गोष्ट आहेत. पण अनेकदा रिक्षा चालकांना प्रवासी हे टोमणेही मारतात आणि त्यावरुन वाद वाढून परिस्थितीत चिघळते. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. 32 वर्षांच्या एका इसमाची मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव (Goregaon) इथं हत्या (Mumbai Murder News) करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
एका रिक्षा चालकाने 32 वर्षांच्या इसमाला भोसकलं आणि त्याचा जीव घेतला, अशी माहिती समोर आली आहे. हत्या करण्यात आलेली व्यक्ती रिक्षा चालकाला सारखे टोमणे मारत होती. टोमणे ऐकून संतापलेल्या रिक्षा चालकाने अखेर टोमणे मारणाऱ्या 32 वर्षांच्या व्यक्तीचा धारदार शस्त्राने भोसकून खून केला.
मंगळवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. गोरगावच्या हनुमान टेकडी परिसरात घडलेल्या या प्रकाराने हीच खळबळ उडालीय. हत्या करण्यात आलेल्या 32 वर्षांच्या इसमाचं नाव मुकेश झंझारे असल्याचं कळतंय.
मुकेश यांनी 45 वर्षीय रिक्षा चालकाला टोमणे मारले होते. याचा रिक्षा चालकाला राग आला. सतत टोमणे मारल्यावरुन आधी दोघांमध्ये बाचाबाची झाली. पण अखेर राग अनावर होऊन रिक्षा चालकाने मुकेश यांना धारदार शस्त्राने भोसकलं.
जखमी मुकेश यांना तातडीने जोगेश्वरी येथील रुग्णालयात उपचारासठी दाखल करण्यात आलं. पण तिथे त्यांनी बुधवारी सकाळी मृत घोषित करण्यात आलं.
या हत्याप्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कलम 302 अन्वये रिक्षा चालकालावर गुन्हा दाखल करण त्याला अटक करण्यात आली आहे. आता आरोपीची कसून चौकशी केली जाते आहे. वनराई पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.