Mumbai Wadala Murder : ‘आईने काळी जादू केल्यानं आपलं लग्न होत नाहीय’ संशयी पोरांनी आईचा गळाच चिरला, खल्लास!
Mumbai Wadala Murder : पोलिसी खाक्या दिसताच तिघांनीही हत्येची कबुली दिली.
मुंबई : पोटच्या मुलांनी आपल्याच आईची हत्या (Son killed mother) केली. यातील एकानं आपल्या प्रेयसीचीही मदत आईची हत्या करण्यासाठी घेतली होती. याप्रकरणी मुंबई (Mumbai Murder News) पोलिसांनी तिघांना अटक केलीय. या हत्येमागंच कारण थरकाप उडवणारं आहे. आईने काळी जादू केल्यामुळे आपलं लग्न होत नाही, असा संशय या मुलांना होता. त्यातून त्यांनी आपल्या जन्मादात्या आईलाच संपवलं आहे. आई आणि मुलांच्या नात्याला काळीमा फासणारी गी घटना वडाळा (Mumbai News) पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली. या घटनेनं एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या हत्येचा उलगडाही गेलाय. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन मुलांना अटक केली आहे. यातील एक मुलगा हा अल्पवयीन आहे. तर एका मुलाची प्रेयसीही या हत्याकाडांचा भाग होती, असंही पोलीसांच्या तपासातून समोर आलंय. सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी केली जातेय. या चौकशीतून अधिक माहिती आणि हत्याकांडाचा कट कसा रचला, याबाबींचा खुलासा होण्याची शक्यताय.
आईचा गळाच चिरला
निर्मला ठाकूर असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. निर्मला आपला पती आणि दोन मुलांसह कोरबा मिठागर इथं राहत होत्या. आपली आई काळी जादू करता असा संशय मुलांना होता. काळी जादू केल्यामुळे आपलं लग्न होत नाही, या संशयामुले मुलांनी आपल्या आईच्या हत्येचा कट रचला.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच निर्मला यांचा मुलगा अक्षय याचा अपघात झालेला. हा अपघातही आईने केलेल्या काळ्या जादूमुळे झाला, असं वाटून अक्षयचा संशय आणखीनच बळावला होता. अखेर त्यानं अल्पवयीन भाऊ आणि प्रेयसीची मदत घेत आईचा काटा काढला.
अशी केली हत्या…
शुक्रवारी अक्षय आणि त्याचा अल्पवीन भाऊ पिकनिकला जात असल्याचं सांगून गेले. लोणावल्याला जात असल्याचं सांगत ते घराबाहे पडले. संध्याकाळी निर्मलाचा पतीही कामानिमित्त बाहेर गेला. रात्री निर्मला एकट्याच घरी होती. हे पाहून अक्षय ठाकूर, अल्पवयीन मुलगा आणि प्रेयसी कोमल बोईलकर घरात शिरले. तिघांनी मिळून आईचा गळा चिरला आणि निर्मला ठाकूर यांची हत्या केली.
दुसऱ्या दिवशी निर्मलाचा पती जेव्हा घरी आला, तेव्हा त्याला आपली पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसलं. हे पाहणून पतीला धक्काच बसला. त्यानं याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर वडाळा पोलिसांनी या संपूर्ण घटनेप्रकरणी तातडीनं पावलं उचलत तपास सुरु केला.
सीसीटीव्ही व्हिडीओ, प्राथमिक चौकशी यानंतर पोलिसांनी या हत्येचा छडा लावत तिघांना बेड्या ठोकल्यात. पोलिसी खाक्या दिसताच तिघांनीही हत्येची कबुली दिली.