Mumbai Crime : हरिद्वार बुकिंगच्या नावाखाली LIC अधिकाऱ्याची फसवणूक, ‘अशी’ केली लूट

हल्ली सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी विविध फंडे अवलंबत आहेत. उच्चशिक्षित व्यक्तीही या गुन्हेगारांच्या तावडीतून सुटत नाहीत.

Mumbai Crime : हरिद्वार बुकिंगच्या नावाखाली LIC अधिकाऱ्याची फसवणूक, 'अशी' केली लूट
बुकिंगच्या नावाखाली एलआयसीअधिकाऱ्याची फसणूक
Follow us
| Updated on: Aug 23, 2023 | 11:26 AM

मुंबई / 23 ऑगस्ट 2023 : हरिद्वारमध्ये हॉटेल बुकिंगच्या नावाखाली एलआयसी अधिकाऱ्याची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. हॉटेल बुकिंगच्या नावाखाली अधिकाऱ्याची एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अधिकाऱ्याने मुलुंड पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. सायबर गुन्हेगार विविध मार्गांनी नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करतात. सायबर गुन्हे रोखणे हे मोठे आव्हान आहे. नागरिकांनी अशा गुन्हेगारांपासून सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे.

‘अशी’ केली फसवणूक

मुलुंड येथील रहिवासी असलेले LIC मधील विकास अधिकाऱ्याने आपल्या कुटुंबासह हरिद्वार येथे जाण्याचा प्लान केला होता. यासाठी त्यांनी रेल्वेची तिकिटं बुक केली होती आणि 27 ऑगस्ट रोजी ते मुंबईहून हरिद्वारसाठी निघणार होते. यासाठी रविवारी ते हरिद्वार येथे राहण्याची व्यवस्था पाहत होते. यासाठी ते हरिद्वारमधील धर्मशाळांसाठी ऑनलाईन बुकिंग पाहत होते. त्यांना इंटरनेटवर नकलंक धामचा नंबर सापडला. त्यांनी त्यावर चौकशीसाठी कॉल केला. कॉल रिसिव्ह करणाऱ्याने व्हॉट्सअॅपवर डिटेल्स पाठवणार असल्याचे पीडितेला सांगितले.

नऊ दिवसांच्या मुक्कामासाठी अधिकाऱ्याला 13,500 पर्यंत खर्च येईल असे सांगितले. त्याला खोलीच्या पुष्टीकरणासाठी 6,750 भरण्यास सांगण्यात आले. यानंतर उर्वरित रक्कमही भरण्यास सांगण्यात आले, म्हणून त्यांनी पुन्हा 6,750 रुपये दिले. पेमेंट करूनही फसवणूक करणाऱ्याने अधिकाऱ्याला सांगितले की, पेमेंट न मिळाल्याने त्यांचे बुकिंग अद्याप निश्चित झाले नसल्याचे सांगितले.

हे सुद्धा वाचा

अधिकाऱ्याने त्यांच्यावर विश्वास ठेवून पत्नीच्या बँक खात्यातून 13,500 रुपये भरले. त्यानंतर त्यांनी सांगितले की, त्यांना दुप्पट पैसे मिळाले आहेत. तथापि, त्यांना पैसे परत पाठवण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्याला 29,994 भरण्यास सांगितले, जे त्यांनी आम्हाला एकत्र परत पाठवू असे आश्वासन दिले. त्यावर विश्वास ठेवून अधिकाऱ्याने ती रक्कम भरली. यानंतरही फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना व्यवहार अपूर्ण असल्याचे सांगितले. यानंतर सर्व काही परत करण्याचे आश्वासन देऊन 43,494 रुपये अधिक भरण्यास सांगितले. असे एकूण 1,00,488 भरल्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी आणखी पैसे मागितले.

परंतु अधिकाऱ्याने अधिक पैसे देण्यास नकार दिला आणि त्याऐवजी सर्व पेमेंट परत करण्यास आणि बुकिंग रद्द करण्यास सांगितले. यानंतर फसवणूक करणार्‍यांनी त्याचे फोन कॉल्स घेणे बंद केले. यावेळी अधिकाऱ्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर अधिकाऱ्याने पोलीस ठाण्या धाव घेत अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.