मुंबई | 29 नोव्हेंबर 2023 : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील चेंबूर परिसरामध्ये गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आहे. त्यामुळे घरं कोसळून सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत या घटनेतील 11 लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेंबुरच्या जुन्या बॅरॅक गोल्फ क्लबजवळ असलेल्या एका दुमजली घरांच्या चाळीत ही घटना घडली आहे. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा स्फोट झाला. चाळीतील सलग चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या घरात स्फोट झाला आहे. मात्र त्या हादऱ्यामुळे चाळीतील चार-पाच घरे धाडकन खाली कोसळली. तळ मजल्यावरील आणि पहिल्या मजल्यावरील घरांचं बरंच नुकसान झालं. या स्फोटात 5-6 जण जखमी झाले आहेत. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव मोहिम सुरू केली. आत्तापर्यत सुमारे 11 नागरिकांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात यश मिळालं आहे.
Mumbai: An incident of a house collapse due to a cylinder blast has been reported in the Chembur area of Mumbai, four people sustained injuries and have been sent to a nearby hospital. 11 people have been rescued safely, so far: BMC
— ANI (@ANI) November 29, 2023
जखमींची नावे
1) विकास आंबोरे – 50 वर्षं
2) अशोक आंबोरे – 27 वर्षं
3) सविता आंबोरे – 47 वर्षं
4) रोहित आंबोरे – 29 वर्षं
5) राहुल कांबळे – 35 वर्षं
6) पार्थ सिंग – 21 वर्षं