Mumbai Crime : बँक ऑफ इंडियातून लाखोंचं सोनं चोरीला, मुंबईतील धक्कादायक घटना

हल्ली चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे बहुतेक नागरिक बँक लॉकरमध्ये आपले सोने ठेवतात. पण मुंबईत उघडकीस आलेल्या घटनेमुळे बँकाही सुरक्षित आहेत का हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Mumbai Crime : बँक ऑफ इंडियातून लाखोंचं सोनं चोरीला, मुंबईतील धक्कादायक घटना
बँक अधिकाऱ्यानेच लॉकरमधील सोने चोरलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 04, 2023 | 4:13 PM

मुंबई / 4 ऑगस्ट 2023 : आजकाल चोरी, दरोड्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे हल्ली नागरिक आपले सोने, महत्वाची कागदपत्रे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतात. मात्र दोन ग्राहकांना बँकेत सोने ठेवणं महागात पडले आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोने बँकेच्याच अधिकाऱ्याने चोरल्याची घटना मुंबईतील वाळकेश्वर परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. यामुळे बँकेत देखील सोने ठेवणे आता सुरक्षित नसल्याचे दिसून येते. याप्रकरणी मलबार हिल पोलिसात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दिलीपकुमार चव्हाण असे अटक बँक आरोपीचे नाव आहे.

ग्राहकांनी लॉकर खोलले असता सोने गायब होते

नेपन्सी रोड येथील रहिवासी असलेल्या मृणालिनी जयसिंगानी आणि दीपक नाथवानी यांचे वाळकेश्वर येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत लॉकर आहेत. या लॉकरमध्ये जयसिंगानी आणि नाथवानी यांनी आपले लाखो रुपयांचे सोने ठेवले होते. या दोघांनी जेव्हा आपले लॉकर खोलून पाहिले तेव्हा आतील सोने गायब होते. जयसिंगानी यांचे 323 ग्रॅम सोने आणि 32.5 लाखांचे डायमंड ज्वेलरी लॉकरमधून गायब होते. तर नाथवानी यांचेही 323 ग्रॅम सोने लॉकरमधून गायब होते.

मलबार हिल पोलिसांकडून बँक अधिकाऱ्याला अटक

जयसिंगानी आणि नाथवानी यांनी तात्काळ मलबार हिल पोलिसात दागिने चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी चोरीचा शोध घेण्यासाठी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बँक अधिकारी चव्हाण यानेच डुप्लीकेट चावीच्या सहाय्याने लॉकर उघडून सोने नेल्याचे उघडकीस आले. यानंतर पोलिसांनी चव्हाण याला अटक केली आहे. दिलीपकुमार चव्हाण हा बँक ऑफ इंडियात संरक्षक अधिकारी म्हणून कार्यरत आहे. पदाचा गैरफायदा घेऊन त्याने लॉकरच्या डुप्लीकेट चाव्या बनवल्या आणि चोरी केली.

हे सुद्धा वाचा

मलबार हिल पोलिसांनी चव्हाण विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आरोपीकडून 481 ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. या गुन्ह्यात चव्हाण याच्यासोबत आणखी किती लोकांचा सहभाग आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.