Mumbai Crime : नवीन घर घेण्याआधी गावी देवीच्या जत्रेला गेली, गावाहून येताच धक्काच बसला, कारण काय?

महिलेला नवीन घर घ्यायचे होते. त्याआधी ती गावी देवीच्या जत्रेला गेली. पती सुट्टी नसल्याने घरीच होता. नेहमीप्रमाणे पती सकाळी कामावर निघून गेला. त्यानंतर जे घडलं त्याने महिलेला धक्काच बसला.

Mumbai Crime : नवीन घर घेण्याआधी गावी देवीच्या जत्रेला गेली, गावाहून येताच धक्काच बसला, कारण काय?
घरात कुणी नसल्याची संधी साधत रोकड चोरली
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 8:31 AM

मुंबई / 29 ऑगस्ट 2023 : मुंबईत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. घरात कुणी नसल्याचा फायदा घेत दिवसाढवळ्याही चोरटे घरात घुसून चोरी करत आहेत. अशीच एक घटना विलेपार्ले येथे उघडकीस आली आहे. विलेपार्ले येथे घरात कुणी नसल्याची संधी साधत घरात घुसून रोख रक्कम चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या घरातून आठ लाखाची रक्कम चोरट्याने लंपास केली आहे. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुहू पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे. नवीन घर घेण्यासाठी महिलेने हे पैसे बँकेतून काढून घरी आणून ठेवले होते.

घरी कुणी नसल्याचा फायदा घेत चोरी

विलेपार्ले येथील नेहरु नगरमधील रहिवासी असलेल्या वल्ली सेल्वम कौंदर या महिलेच्या फिर्यादीवरुन जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वल्ली कौंदर यांचा पती गॅरेजमध्ये काम करतो. वल्ली हिची गावी वडिोपार्जित जमीन होती. ही जमीन 20 लाख रुपयांना विकण्यात आली. जमिनीचे पैसे नातेवाईकांनी पैसे वाटून घेतले. यापैकी वल्ली आणि तिच्या भावाला 8 लाख रुपये मिळाले.

नवीन घर घेण्यासाठी आणले होते पैसे

वल्ली हिला नवीन घर घ्यायचे होते. यासाठी तिने बँकेतून 8 लाख रुपयांची रक्कम काढली होती. ही रक्कम तिने घरातील पोटमाळ्यावरील एका डब्यात ठेवली होती. यानंतर वल्ली आपल्या भावासह गावी देवीच्या जत्रेला गेली होती. तर तिचा पती नेहमीप्रमाणे सकाळी कामावर निघून गेला. ती कामावर निघून गेल्यानंतर दुपारी वल्ली गावाहून घरी परतली असता घरी चोरी झाल्याचे तिच्या लक्षात आले.

हे सुद्धा वाचा

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

तिने पोटमाळ्यावर ठेवलेली रक्कम तपासली असता ती गायब असल्याचे तिच्या लक्षात आले. यामुळे वल्लीला मानसिक धक्का बसला. तिने जुहू पोलीस ठाणे गाठत चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.