Mumbai Crime : आयआरएस अधिकारी सचिन सावंतविरोधात आरोपपत्र दाखल, दाक्षिणात्य अभिनेत्रीचाही जबाब नोंदवला !

मनी लाँड्रिग प्रकरण आणि बेहिशेबी मालत्ता जमवल्याप्रकरणी आयआरएस अधिकारी सचिन सावंत चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सावंत यांच्या सीबीआय आणि ईडीने कारवाईचा फार्स आवळला आहे.

Mumbai Crime : आयआरएस अधिकारी सचिन सावंतविरोधात आरोपपत्र दाखल, दाक्षिणात्य अभिनेत्रीचाही जबाब नोंदवला !
आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्यावर आरोपपत्र दाखलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 4:18 PM

मुंबई / 29 ऑगस्ट 2023 : मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्यावर अखेर मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी ईडीने एका दाक्षिणात्य अभिनेत्रीचाही जबाब नोंदवला आहे. सचिन सावंत आणि या अभिनेत्रीमध्ये झालेल्या पैशांच्या व्यवहारातून तिची चौकशी करण्यात आली. ईडीने संबंधित व्यवहाराच्या प्रकरणात अभिनेत्रीला समन्स जारी करुन बोलावले होते. सचिन सावंत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली आहे. सचिन सावंत लखनौ जीएसटी विभागात कार्यरत होते. याआधी सावंत ईडीमध्ये उपसंचालक पदावर कार्यरत होते. सचिन सावंत यांच्या विरोधात सीबीआयने बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा दाखल दाखल केला होता. त्या प्रकरणी मनी लॉड्रिंगच्या अनुषंगाने ईडी तपास करत होती.

बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचाही सावंत यांच्यावर आरोप

आयआरएस अधिकारी सचिन सावंत हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सुमारे 500 कोटींच्या अफरातफर प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप ठेवत सचिन सावंत यांना जून महिन्यात अटक करण्यात आली आहे. यानंतर सावंत बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचेही उघडकीस आले. यानंतर ईडी आणि सीबीआय दोन्ही संस्थांनी सावंत यांच्याभोवती कारवाईचा फास आवळला. सीबीआयने सचिन सावंत यांच्या आई-वडिल आणि पत्नीलाही आरोपी केले आहे.

सचिन सावंत यांचे वडील बाळासाहेब सावंत हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या नावे दाद येथे सेव्हन हिल कन्ट्रोवेल कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय दादर येथे आढळले. तसेच सानपाडा येथील फ्लॅट खरेदी करण्यासाठी सावंत यांनी एक कोटी 2 लाख रुपये रोकड दिली होती. ही रोकडही बेकायदेशीर असल्याचा आरोप ईडीने केला आहे. तसेच सावंत यांच्या 44 लाखांची बीएमडब्लू कार आढळली.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.