Mumbai Crime : पार्टटाईम जॉबचे आमिष दाखवत चक्क सीएलाच गंडा, सोशल मीडियाचे ज्ञान असलेले मंडळीही जाळ्यात

हल्ली सायबर फसवणुकीचे गुन्हे वाढले आहेत. विशेषतः पार्टटाईमचे आमिष दाखवत लुटीचे प्रकार वाढले आहेत. सोशल मीडियाचे ज्ञान असलेल्या उच्चशिक्षित व्यक्तीही याला अपवाद नाहीत.

Mumbai Crime : पार्टटाईम जॉबचे आमिष दाखवत चक्क सीएलाच गंडा, सोशल मीडियाचे ज्ञान असलेले मंडळीही जाळ्यात
पार्टटाईम नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला गंडा
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 6:51 PM

मुंबई / 19 ऑगस्ट 2023 : मुंबई देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. सोशल मीडियाचे चांगले ज्ञान असलेली तरुण मंडळीही फसवणुकीच्या जाळ्यात अडकत आहेत. माटुंगा येथील 22 वर्षांचा विद्यार्थी सायबर फसवणुकीचा बळी ठरला. त्याला अॅमेझॉनच्या नेटवर्कमध्ये सेल्स वाढवण्यास मदत केल्यास बक्कळ पैसा कमावता येतो. दिवसाला 500 रुपयांपासून ते 80 हजार रुपयांपर्यंत पैसे कमावू शकता, असे आमिष दाखवण्यात आले. व्हॉट्स अॅपवर आलेल्या एका मॅसेजला रिप्लाय केला आणि पुढे हळूहळू फिर्यादी तरुण फसवणुकीच्या जाळ्यात कधी फसला गेला, ते त्या तरुणाला कळलेच नाही. त्याने या फसवणुकीमध्ये तब्बल 97 हजार रुपये गमावले आहेत.

विशेष म्हणजे हा तरुण चार्टर्ड अकाऊंटंट असून झालेल्या फसवणुकीबद्दल त्याने मध्य मुंबईतील माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सायबर फसवणुकीशी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पार्टटाईम जॉबचे आमिष दाखवत फसवणूक

पीडित विद्यार्थी हा माटुंगा परिसरातील रहिवाशी आहे. गेल्या महिन्यात त्याची फसवणूक झाली आणि त्यात जवळपास 1 लाखांच्या घरात पैसे गमावले. त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात धक्कादायक गोष्टींचा उलगडा केला. तरुणाला मोबाईलवर व्हॉट्सअॅप मेसेज आला होता. त्या सुरुवातीच्या मॅसेजमध्ये त्याला ऑनलाईन पैसे कमावण्याचे प्रलोभन दाखवण्यात आले. तरुणाला त्या मॅसेजवर विश्वास ठेवणे महागात पडले. सुयोगने पहिला मेसेज वाचला, तोच काही वेळात त्याला दुसरा मेसेज आला. आपण अॅमेझॉन मल्टीनॅशनलमध्ये कार्यरत असल्याचे मॅसेज करणार्‍या व्यक्तीने सांगितले.

हे सुद्धा वाचा

आमच्या कंपनीचे काम अॅमेझॉन स्टोअर्सना विक्री रँकिंग सुधारण्यात मदत करणे, अॅमेझॉनच्या विक्रेत्यांचा सेल्स वाढविणे हे असेल. हे काम केल्यानंतर आपल्याला बक्कळ पैशाचे आमिष दाखवले. तसेच हे काम करण्यासाठी फक्त मोबाईल किंवा संगणक गरजेचा आहे. आपणास सिस्टमच्या माध्यमातून ऑर्डर पाठवली जाईल. ती पूर्ण केल्यास बक्षीस दिले जाईल. या बक्षिसाची दैनंदिन रक्कम 500 ते 80000 रुपयांच्या घरात असेल, असे आमिष दाखविले गेले. एक टास्क देण्यात येईल, तो पूर्ण केल्यास पुढील तीन ते पाच मिनिटांतच आधी जमा केलेले तसेच कमिशनचे पैसे काढता येतील, असेही सांगण्यात आले.

विश्वास संपादन करत पैसे भरण्यास सांगितले

या आमिषाला बळी पडून तरुणाने काम करण्यास होकार दिला. त्यानंतर सुयोगला लिंकद्वारे पाठवलेले मोबाईल अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. अॅप डाउनलोड केल्यानंतर सुयोगला टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी होण्यास सांगण्यात आले. त्या ग्रुपच्या माध्यमातून पैसै कमावण्याची कामे देण्यात आली. हा सर्व प्रकार घडून सुयोगने 97 हजारांच्या आसपास पैसै गमावले. या प्रकरणाची माटुंगा पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून अधिक तपास सुरु केला आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.