Mumbai Crime : डिनरसाठी चाललेल्या दोघा मित्रांवर हल्ला, एक तरुण गंभीर जखमी, हल्ल्याचे कारण अज्ञात

दोघे मित्र रात्री डिनरसाठी हॉटेलमध्ये चालले होते. वाटेत एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी थांबले. त्यानंतर एटीएममध्ये गेलेला मित्र थेट रुग्णालयातच पोहचला.

Mumbai Crime : डिनरसाठी चाललेल्या दोघा मित्रांवर हल्ला, एक तरुण गंभीर जखमी, हल्ल्याचे कारण अज्ञात
हॉटेलमध्ये जेवायला चाललेल्या तरुणावर हल्ला
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 2:00 PM

मुंबई / 1 ऑगस्ट 2023 : रात्री उशिरा डिनरसाठी चाललेल्या दोघा मित्रांवर अज्ञातांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील जुहू परिसरात घडली. या हल्ल्यावेळी एक मित्र पळून जाण्यात यशस्वी झाला, तर एकाला गंभीर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणावर कोकिलाबेन रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पीडितांच्या फिर्यादीवरुन जुहू पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा हल्ला कुणी आणि का केला? याबाबत अद्याप कळू शकले नाही. आकाश साळुंखे असे जखमी 26 वर्षीय तरुणाचे नाव आहे.

दोघे मित्र डिनरसाठी चालले होते

अंधेरी येथील रहिवासी असलेले आकाश साळुंखे आणि ऋषिकेश शेट्टी हे दोघे मित्र रविवारी मध्यरात्री जुहूमधील हॉटेलात डिनरसाठी चालले होते. रात्री दीडच्या सुमारास त्यांनी एटीएममधून पैसे काढण्यासाठी जुहू सर्कलवर रिक्षा थांबवली. त्यानंतर आकाश एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला. यादरम्यान तीन ते चार लोक त्यांच्या रिक्षाजवळ आले आणि त्यांनी एवढ्या रात्री कुठे फिरता असे विचारले. यावेळी रिक्षात बसलेला ऋषिकेश घाबरुन रिक्षा घेऊन पळून गेला.

अज्ञातांच्या बेदम मारहाणीत तरुण गंभीर जखमी

एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेला आकाश आरोपींच्या तावडीत सापडला. आरोपींनी आकाशला लोखंडी सळीने बेदम मारहाण केली. यात आकाश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिताच्या कलम 323, 324, 34 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, आरोपी कोण होते, त्यांनी आकाशवर हल्ला का केला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. जुहू पोलीस घटनेचा तपास करत आहेत. आरोपींना पकडण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहेत. आरोपींना अटक केल्यानंतर सर्व प्रकरण उजेडात येईल.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.