Mumbai Crime : अखेर ‘त्या’ व्यावसायिकाचा मृतदेह सापडला, सी-लिंकवरुन घेतली होती उडी

सोमवारी पहाटे एका व्यक्तीने वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन उडी घेतल्याची घटना घडली होती. यानंतर नौदलाकडून सदर व्यक्तीचा सुरु शोध अखेर थांबला आहे.

Mumbai Crime :  अखेर 'त्या' व्यावसायिकाचा मृतदेह सापडला, सी-लिंकवरुन घेतली होती उडी
वांद्रे-वरळी सी-लिंवकरुन उडी घेतलेल्या व्यावसायिकाचा मृतदेह आढळलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 8:03 AM

मुंबई / 2 ऑगस्ट 2023 : वांद्रे वरळी सी-लिंकवरुन उडी घेतलेल्या व्यावसायिकाचा अखेर शोध लागला आहे. दादर येथील शिवाजी पार्क येथील समुद्रात व्यावसायिकाचा मृतदेह आज तरंगताना आढळला. टिकम माखिजा असं मयत व्यावसायिकाचे नाव आहे. सोमवारी पहाटे 5.30 वाजता माखिजा यांनी सी-लिंकवरुन उडी घेतली होती. यानंतर नौदलाकडून त्यांचा शोध सुरु होता. अखेर अथक परिश्रमानंतर पोलीस, अग्निशमन दल, तटरक्षक दल आणि नौदलाच्या पथकाने टिकम यांचा मृतदेह शोधून काढला. शिवाजी पार्क येथील समुद्रात मृतदेह तरंगत होता.

सोमवारी पहाटे सी-लिंकवरुन घेतली होती उडी

माखिजा हे खार पश्चिमेला पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. त्यांचा गारमेंटचा व्यवसाय होता. सोमवारी पहाटे ते मेव्हण्याच्या गाडीने वांद्रे-वरळी सी-लिंकवर गेले. त्यांनी गाडी सी-लिंकवर उभी केली आणि समुद्रात उडी घेतली. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली होती. माखिजा शोध घेण्यासाठी नौदलाचे हेलिकाॅप्टर पाचारण करण्यात आले होते. हेलिकाॅप्टरच्या माध्यमातून माखिजा यांचा समुद्रात शोध सुरु होता.

कारण अद्याप अनभिज्ञ

माखिजा यांनी कोणत्या कारणातून असे टोकाचे पाऊल उचलले हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत. माखिजा यांनी व्यावसायिक तणावातून टोकाचे पाऊल उचलले की घरगुती कारणातून? याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. चौकशीअंती सर्व सत्य समोर येईल. पोलीस नातेवाईकांचीही चौकशी करत आहेत.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.