Mumbai Crime : क्षुल्लक कारणातून दोघा भावांवर हल्ला, एकाचा मृत्यू तर एक जखमी

काही तरुणांमध्ये काही कारणातून वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि भररस्त्यात भयंकर घटना घडली.

Mumbai Crime : क्षुल्लक कारणातून दोघा भावांवर हल्ला, एकाचा मृत्यू तर एक जखमी
क्षुल्लक कारणातून एकाची हत्या, एक जखमी
| Edited By: | Updated on: Aug 01, 2023 | 3:50 PM

मुंबई / 1 ऑगस्ट 2023 : क्षुल्लक कारणातून भररस्त्यात तरुणांचा वाद झाला. या वादातून दोघा भावांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एका भावाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मलिक शेख असे मयताचे तर अमन शेख असे जखमी तरुणाचे नाव आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीसह अन्य तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. आरोपी आणि पीडितांमध्ये नक्की कोणत्या कारणातून वाद झाला, याबाबत अद्याप कळू शकले नाही. तपासाअंती सर्व स्पष्ट होईल.

काय घडलं नेमकं?

ट्रॉम्बे परिसरातील चिता कँप येथे मलिक शेख आणि अमन शेख यांचा काल रात्री काही तरुणांशी वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि आरोपींनी दोघा भावांवर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात मलिक जागीच ठार झाला तर अमन गंभीर जखमी झाला. जखमी तरुणाला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सीसीटीव्हीच्या मदतीने चौघांना अटक

घटनेची माहिती मिळताच ट्रॉम्बे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी चार तरुणांना अटक केली आहे. तरुणांमध्ये नेमका काय वाद होता हे कळले नाही.