Jaipur-Mumbai Train Firing : जयपूर-मुंबई ट्रेन गोळीबार प्रकरण, तीनपैकी दोन प्रवाशांची ओळख पटली !

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये झालेल्या गोळीबारात तीन निष्पाप प्रवाशांचा हकनाक बळी गेला. यापैकी दोघांची ओळख पटवण्यास यश आले आहे.

Jaipur-Mumbai Train Firing : जयपूर-मुंबई ट्रेन गोळीबार प्रकरण, तीनपैकी दोन प्रवाशांची ओळख पटली !
गोळीबारातील दोन मृत प्रवाशांची ओळख पटलीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 31, 2023 | 3:57 PM

गोविंद ठाकूर, विजय गायकवाड, टीव्ही 9 मराठी मुंबई / 31 जुलै 2023 : जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये आज पहाटेच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात एका आरपीएफच्या एएसआयसह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या तीन प्रवाशांपैकी दोघांची ओळख पटवण्यास पोलिसांना यश आले आहे. कादर भानपुरावाला आणि असगर अशी दोघांची नावे आहेत. कादर हे नालासोपारा येथील रहिवासी आहेत, तर असगर हे मूळचे बिहारमधील रहिवासी आहेत. गोळीबारात मृत्यू झाल्याची बातमी कळताच दोघांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नातेवाईक करत आहेत.

कादर पुनावाला नालासोपारा येथील रहिवासी

कादर पुनावाला हे नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडवरील तेज प्रतिमा इमारतीत आपल्या कुटुंबासह राहतात. कादर हे मोहरमनिमित्त जयपूरला नातेवाईकाकडे गेले होते. तेथून जयपूर-मुंबई एक्सप्रेसने मुंबईला परतत असतानाच ही घटना घडली. विशेष म्हणजे काही वेळात ते आपल्या इच्छित स्थानकाजवळ पोहचणार इतक्यातही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच कादर यांच्या कुटुंबीय आणि शेजाऱ्यांना धक्का बसला. कुटुंबीयांनी तात्काळ शताब्दी रुग्णालयाकडे धाव घेतली.

असगर कामाच्या शोधात मुंबईकडे निघाला अन्…

दुसरा मयत असगर हा मूळचा बिहारमधील मधुबनी येथील असून, कामाच्या शोधात तो जयपूरहून मुंबईला येत होते. असगर यांना चार मुलं आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कामानिमित्त ते मुंबईत येत होते. आरोपीने असगरवर चार गोळ्या झाडल्या. पोलिसांनी असगरच्या नातेवाईकांना व्हिडिओ कॉल करुन मृतदेहाची ओळख पटवली. यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. असगरच्या कुटुंबीयांनी आरोपीला कोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच असगरवर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्याची मागणी करत सरकारकडे नुकसान भरपाई मागितली आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.