BIG BREAKING | मुंबईतील दोन बड्या बिल्डरांना बेड्या, पोलिसांची सर्वात मोठी कारवाई

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज सर्वात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी घराचं स्वप्न दाखवून सर्वसामान्यांकडून कोट्यवधी रुपये घेवून घराचा ताबा न दिल्याच्या आरोपाखाली दोन बड्या बिल्डरांना बेड्या ठोकल्या आहेत. या बिल्डरांना कोर्टाने पोलीस कोठडीदेखील सुनावली आहे.

BIG BREAKING | मुंबईतील दोन बड्या बिल्डरांना बेड्या, पोलिसांची सर्वात मोठी कारवाई
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 9:53 PM

मुंबई : मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेने आज सर्वात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी निर्मल लाईफस्टाईलच्या बिल्डर्स कंपनीच्या संचालकांना अटक केली आहे. बिल्डर धर्मेश जैन (Dharmesh Jain) आणि राजीव जैन (Rajiv Jain) यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांना 3 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर फ्लॅट विकण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप आहे. संबंधित प्रकरण किती भयानक आहे याची प्रचिती आता समोर येताना दिसत आहे.

सर्वसामान्य माणूस मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहतो, पण काही बिल्डर याच स्वप्नांचा चुराळा कशाप्रकारे करतात ते आता या प्रकरणाच्या निमित्ताने स्पष्ट होताना दिसत आहे. हे प्रकरण किती भयंकर आहे, यामध्ये कुणाकुणाचे हात बरबरटले आहेत, मुंबईत घर घेऊ पाहणाऱ्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करणारा कोट्यवधींचा घोटाळ्याची व्याप्ती किती आहे, याबाबतचं स्पष्टीकरण होतं का, ते पाहणं महत्त्वाचं आहे.

फ्लॅट विकण्याच्या नावाखाली सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक करण्याच्या गंभीर आरोपाखाली मुलुंड स्थित निर्मल लाईफ स्टाईल बिल्डर्सला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेच्यावतीने ही कारवाई करण्यात आली आहे. बिल्डर धर्मेश जैन आणि राजीव जैन यांना आज सकाळी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे पोलिसांकडे आतापर्यंत एकूण 34 फ्लॅट खरेदी करणाऱ्यांनी तक्रार केली आहे. जवळपास 11 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं तपासात समोर आलंय. मात्र तक्रारदारांची ही संख्या आणि फसवणुकीची रक्कम ही जास्त असल्याचा पोलिसांना संशय आहे.

2022 मध्ये एफआयआर दाखल

आरोपींनी सर्वसामान्य लोकांना फ्लॅट देण्याच्या नावाखाली फसवणूक केली. फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेतले. मात्र अनेक वर्ष उलटले तरीदेखील ग्राहकांना त्यांचे फ्लॅट दिले गेले नाहीत. या प्रकरणी 2022 मध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलीस या प्रकरणी तपास करत होते. या दरम्यान अनेकांनी तक्रार केली. त्यामुळे पोलिसांनी तपासाला जास्त गती दिली आणि आज अखेर बिल्डर धर्मेश जैन आणि राजीव जैन या दोघांना अटक करण्यात आली. दोघांना आज संबंधित कोर्टात हजर केलं असता 3 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

विशेष बाब अशी आहे की, धर्मेश जैन हे निर्मल लाईफ स्टाईल या कंपनीचे संचालक आहेत. जैन यांनी अनेक प्रकल्प सुरू केले. मात्र ज्या लोकांनी फ्लॅटची बुकिंग केली त्यांना वेळेवर फ्लॅट मिळाले नाहीत. त्याचबरोबर त्यांनी जे पैसे गुंतवले होते ते पैसे देखील त्यांना मिळाले नाहीत. त्यामुळे संबंधित ग्राहकांनी पोलिसांकडे दाद मागितली होती.

पोलिसांनी या प्रकरणी 2022 मध्ये गुन्हा दाखल केला होता. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू होती. अखेर चौकशीअंती दोन्ही बिल्डरला अटक करण्यात आली आहे. मात्र बिल्डरला अटक झाल्यानंतर इतर ज्या कोणाला या बिल्डर्सनी फसविले आहे ते मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेकडे आपली तक्रार करण्याची शक्यता आहे, जेणेकरून हा हाऊसिंग घोटाळा म्हणजेच फ्लॅट विकण्याच्या नावाखाली करण्यात आलेला मोठा घोटाळा समोर येईल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.