Fraud : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 40 चीनी नागरिकांसह 150 जणांविरोधात एफआयआर दाखल

दाखल करण्यात आलेल्या 34 एफआयआरमध्ये 30 हून अधिक चार्टर्ड अकाउंटंट (सीए), 30 कंपनी सेक्रेटरी (सीएस) आणि कंपन्यांच्या संचालकांची नावे आहेत. ज्या 60 परदेशी नागरिकांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत, त्यापैकी 40 चीनमधील आहेत आणि उर्वरित सिंगापूर, यूके, तैवान, यूएसए, सायप्रस, यूएई आणि दक्षिण कोरिया येथील आहेत.

Fraud : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 40 चीनी नागरिकांसह 150 जणांविरोधात एफआयआर दाखल
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 150 जणांविरोधात एफआयआर दाखलImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 9:01 PM

मुंबई : कायद्याचे उल्लंघन आणि फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) 40 चीनी नागरिकांसह 150 लोकांविरुद्ध 34 एफआयआर (FIR) नोंदवले आहेत. गुन्हे नोंदवण्यात आलेल्यांमध्ये 60 परदेशी नागरिकांचा समावेश असून त्यापैकी 40 चीनचे आहेत. नवीन कंपन्यांच्या नोंदणीबाबत कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल आणि भारतीय कंपन्यांचे संचालक बनून फसवणूक केल्याबद्दल हे एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, हे एफआयआर 1 ते 15 एप्रिल दरम्यान नोंदवले गेले आहेत आणि मंगळवारपर्यंत आणखी चार प्रथम माहिती अहवाल नोंदवण्यात येणार आहेत. मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात या तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी फेब्रुवारीमध्ये पहिली एफआयआर नोंदवण्यात आली होती. EOW ने आता तपास हाती घेतला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Mumbai Police Economic Crimes Branch has registered an FIR against 150 people including 40 Chinese nationals)

एफआयआरमध्ये चार्टर्ड अकाऊंटंट, सीएसचा समावेश

दाखल करण्यात आलेल्या 34 एफआयआरमध्ये 30 हून अधिक चार्टर्ड अकाउंटंट (सीए), 30 कंपनी सेक्रेटरी (सीएस) आणि कंपन्यांच्या संचालकांची नावे आहेत. ज्या 60 परदेशी नागरिकांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत, त्यापैकी 40 चीनमधील आहेत आणि उर्वरित सिंगापूर, यूके, तैवान, यूएसए, सायप्रस, यूएई आणि दक्षिण कोरिया येथील आहेत. प्राथमिक तपासानुसार, आरोपींनी आरओसी (रजिस्ट्रार ऑफ कंपनीज), मुंबई यांना खोटी माहिती दिल्याचे EOW च्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. काही प्रकरणांमध्ये, कंपन्यांचे संपर्क पत्ते बदललेले आढळले.

परदेशी नागरिक फसवणूक करून भारतीय कंपन्यांमध्ये संचालक आणि मालक बनल्याचे आरओसीने तक्रारीमध्ये म्हटले आहे. एफआयआरमध्ये कंपनी कायद्याच्या कलम 447 (फसवणूक) सह फसवणूक, गुन्हेगारी कट आणि विश्वासाचा गुन्हेगारी उल्लंघन केल्याबद्दल भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध कलमांचा समावेश करण्यात आला आहे. (Mumbai Police Economic Crimes Branch has registered an FIR against 150 people including 40 Chinese nationals)

इतर बातम्या

Sangli Sabha : सांगलीत महापालिका महासभेत प्रचंड गदारोळ, महिला नगरसेवकांनी राजदंड पळवला

Child Molestation : स्वतःच्या अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करणाऱ्या पित्याला सश्रम कारावासाची शिक्षा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.