Accident : 3 वर्ष, 714 अपघात, 246 मृत्यू, 387 जायबंदी! मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील अपघातांची भीषण आकडेवारी

अपघातांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरतेय. गेल्या तीन वर्षांत झालेल्या सातशेहून अधिक अपघातात 62 जण किरकोळ जखमी झालेत.

Accident : 3 वर्ष, 714 अपघात, 246 मृत्यू, 387 जायबंदी! मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील अपघातांची भीषण आकडेवारी
धक्कादायक आकडेवारी..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 12:09 PM

मुंबई : मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर (Mumbai Pune Express Highway) रविवारी रविवारी विनायक मेटे (Vinayak Mete News) यांचं भीषण अपघात (Express Highway accident) झाला. वयाच्या 52व्या वर्षीं त्यांनी अखेरचा श्वास घेतला या अपघातातील विनायक मेटे यांच्या मृत्यूमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. खोपोली जवळ झालेल्या या अपघातामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरील अपघातांची गेल्या तीन वर्षांची आकडेवारीच आता समोर आली आहे. हा आकडेवारी अत्यंत चिंताजनक असून शेकडो प्रवाशांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर कार अपघातात आपला जीव गमावला आहे. तर कित्येक जण जायबंदी झालेत. तीन वर्षांत सातशेपेक्षा जास्त अपघात, दोनशेपेक्षा जास्त बळी आणि तीनशेपेक्षा जास्त जण गंभीररीत्या जखमी झालेत. 2019 ते 2021 या तीन वर्षांच्या काळातील अपघातांची भीषण आकडेवारी समोर आल्यानंतर मुंबई पुणे एक्स्प्रेस वे हा मृत्यूचा सापळा असल्याचं अधोरेखित झालंय.

भीषण !

2019 ते 2021 या तीन वर्षांत एकूण 714 अपघात झाले. या अपघातांपैकी 207 अपघात हे अत्यंत भीषण होते. या अपघातांत एकूण 246 जणांनी जीव गमावला. तर 386 जण गंभीर जखणी झाले. दरम्यान, गेल्या वर्षभरात म्हणजेच 2021 मध्ये 71 गंभीर अपघात झाले असून त्यात 77 जणांचा मृत्यू झाला असल्याचीही आकडेवारी समोर आलीय.

हे सुद्धा वाचा

का होतायत अपघात?

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरील अपघातांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरतेय. गेल्या तीन वर्षांत झालेल्या सातशेहून अधिक अपघातात 62 जण किरकोळ जखमी झालेत. तर 387 जणांना गंभीर मार बसून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. भरधाव वेगानं बेदरकारपणे वाहन चालवणं, टायर फुटणं, लेन कटिंग, ओव्हरटेंगिक यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याचं समोर आलंय. आतापर्यंत झालेल्या अपघाताच्या वेळा पाहिल्यास, सर्वाधिक अपघात हे रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या सुमारास झाल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

कोणत्या वर्षी किती अपघात झालेत?

वर्षएकूण अपघातएकूण मृत्यूएकूण जखमी
20197492162
2020626679
20217188146

चिंताजनक आकडेवारी

दरम्यान, 2021 साली राज्यात एकूण 12 हजार 553 भीषण अपघात झाले. त्यात 13 हजार 528 जणांनी जीव गमावला तर 10 हजार 877 जण गंभीर जखमी झाले. यात राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 3992 तर राज्य महामार्गावर झालेल्या अपघातात 3411 जणांनी प्राण गमावलाय. तर इतर मार्गावर जीव गमावलेल्यांचा आकडा हा 5724 इतका आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.