VIDEO | वाढदिवसाच्या मिरवणुकीत तलवार नाचवल्याने टीका, अबू आझमी म्हणतात मी उद्धव ठाकरेंनाही पाहिलंय
अबू आझमी यांच्या वाढदिवासाच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीत कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्यात आले. पोलिसांसमोर कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला.
मुंबई : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. मुंबईतील शिवाजी नगर गोवंडी भागात कार्यकर्त्यांनी ही मिरवणूक काढली. समर्थकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलेल्या या मिरवणुकीत अबू आझमी यांनी हातात तलवार नाचवल्याचंही पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्याने टीकेची झोड उठली आहे. मात्र ती तलवार धारदार नव्हती, तर फक्त शोबाजीची होती. तसं तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही पाहिलंय स्टेजवर, असं स्पष्टीकरण अबू आझमींनी दिलं.
अबू आझमी यांच्या वाढदिवासाच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीत कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्यात आले. पोलिसांसमोर कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. शिवाजीनगर परिसरात निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने समर्थक सहभागी झाले होते.
पाहा व्हिडीओ :
अबू आझमी काय म्हणाले?
वाढदिवसाच्या वेळी आम्ही एकही केक कापला नाही. मी कार्यकर्त्यांना विनंती केली होती, की वाढदिवसाच्या वेळी पैसे जमा करा, वायफळ खर्च करु नका, तर जिथे पूर आला आहे, तिथे मदतकार्याला पाठवा. काही कार्यकर्त्यांनी फटाके फोडले, पण कोणाकोणाला समजवणार, कोणी हातात लाठी दिली, कोणी तलवार दिली, ठीक आहे, कार्यकर्त्यांमध्ये जोश असतो, ती तलवार धारदार नव्हती, तर फक्त दिखाव्यापुरती होती. हे कायदेविरोधी आहे, असं मला वाटत नाही. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये शीख समुदायातील बांधवांनी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश कुमार यांना तलवार भेट दिली, ही काय नवीन गोष्ट नाही, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पाहिलंय स्टेजवर, असं अबू आझमी म्हणाले.
कोव्हिडसंबंधी नियमांचं उल्लंघन झाल्याचं बरोबर आहे, पण लोक ऐकत नाहीत, त्यांना समजवलं जात आहे, पण ते म्हणतात, आम्हाला काय सांगता, मोदीजींना सांगा, मोदींनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तोंड न झाकता भ्रमंती केली, कुंभमेळ्यातही नियमांचं उल्लंघन झालं. माझ्या हातात मास्क आहे. गरज असेल तिथे मी लावतो, एक डॉक्टर म्हणाले, हे लावू नका, लवकर मराल, एक म्हणतो मास्क लावा, एक म्हणतो लसीकरण करा, दुसरा म्हणतो करु नका, त्यामुळे जे डॉक्टर मास्क लावणं चुकीचं आहे असं सांगतात, किंवा लसीकरण गरजेचं नसल्याचं सांगतात, त्यांच्यावर सरकारने केस करावी, म्हणजे हे अपसमज असल्याचा संदेश जनतेमध्ये जाईल, अशी मागणीही आझमींनी केली. बस, ट्रेन, लग्न समारंभात गर्दी होत आहे, काय करणार, लोकांचा नाईलाज आहे, असंही अबू आझमी म्हणाले.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, मुस्लिम नेत्यांना लाज वाटायला हवी, राजीनामा द्यावा, अबू आझमी गरजले
पवारांना म्हणालो होतो, वाझेंना घेऊ नका, अबू आझमींचा गौप्यस्फोट