4 वर्षांचा चिमुरडा स्विमिंग पूलमध्ये बुडाला! दिंडोशीमधील घटना, आई ट्रेनरशी बोलत राहिली आणि…

Drown in Swimming pool : माहीर चिराग शहा असं मृत्यू झालेल्या लहान मुलाचं नाव आहे.

4 वर्षांचा चिमुरडा स्विमिंग पूलमध्ये बुडाला! दिंडोशीमधील घटना, आई ट्रेनरशी बोलत राहिली आणि...
दुर्दैवी घटना...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 11:03 AM

मुंबई : चार वर्षांच्या चिमुरड्याचा (four year old boy) स्विमिंग पूलमध्ये (Swimming pool) बुडून मृत्यू झालाय. ही दुर्दैवी घटना गोरेगाव पूर्वेला घडली आहे. स्विमिंग शिकण्यासाठी गेलेल्या या मुलाचा (Mahir Shah Death) दुर्दैवी अंत झालाय. या घटनेनं या चिमुरड्याच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तर स्थानिकांनीही चार वर्षांच्या मुलाच्या मृ्त्यूनंतर हळहळ व्यक्त केली आहे. गोरेगावच्या दिंडोशी इथं शहा कुटुंबीय राहतात. एका उच्चभ्रू लोकवस्तीत राहणाऱ्या शहा कुटुंबातील चार वर्षांच्या मुलाला त्यांची आई स्विमिंगच्या ट्रेनिंगसाठी घेऊन गेली होती. ट्रेनिंग झाल्यानंतर या चिमुरड्याची आई ट्रेनर सोबत बोलत होते. त्यावेळी चार वर्षांचा चिमुरडा हा स्विमिंग पुलाच्या कठड्यावरुन चालत होता. त्याच दरम्यान, या मुलाचा तोल गेला आणि तो स्विमिंग पूलमध्ये कोसळला. बराच वेळ मुलगा कुठे दिसत नाही, म्हणून शोधाशोध सुरु झाली. त्यानंतर हा मुलगा स्विमिंग पूलमध्ये बुडाल्याचं लक्षात आलं. स्विमिंग पूलमधून त्याला तातडीनं बाहेरही काढण्यात आलं होतं.

…तो वाचू शकला असता?

माहीर चिराग शहा असं मृत्यू झालेल्या लहान मुलाचं नाव आहे. माहीरला घेऊन त्याचे आई-वडील स्विमिंग पूलजवळ आल्या होत्या. स्विमिंग झाल्यानंतर माहीरची आई ट्रेनरशी बोलत होती. यावेळी माहीर हा पुलाच्या कठड्यावरुन चालत होता. त्या दरम्यान चालताना त्याचा तोल गेला. तोल जाऊन माहीर स्विमिंग पूलमध्ये पडला.

बराचवेळ माहीर कुठे दिसला नाही, म्हणून त्याच्या आईनं शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तो कुठेच न दिल्यानं काळजी वाटू लागली. यानंतर स्विमिंगपूल जवळ जाऊन माहीरच्या आईनं पाहिलं. तेव्हा माहीत तिथं पडल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर स्विमिंग पूलजवळ उपस्थित असलेल्या लोकांना माहीरला तातडीनं स्विमिंगपूलमधून बाहेर काढलं.

दुःखाचा डोंगर कोसळला

स्विमिंग पूलमधून बाहेर काढल्यानंतर माहीरला तिथली लोकं त्याला तातडीनं जवळच्या रुग्णालयातही दाखल करण्यात आलं. खासगी रुग्णालयात त्याला आणण्यात आलं. मात्र ज्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी जिथं माहीरला नेण्यात आलं होतं, तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यानंतर माहीरच्या आई-वडिलांना मोठा धक्काच बसला. तर स्थानिका रहिवाशांमध्ये प्रचंड हळहळ पसरली.

संबंधित बातम्या :

बहिणीचा फोटो मोबाइलमध्ये का ठेवला? रागाच्या भरात मित्राकडून मित्राचा खून, हिंगोलीत 16 वर्षीय युवकाच्या हत्येनं खळबळ

मोबाइल हिसकावण्याच्या प्रयत्नात तरुणाच्या डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक, पिंपरी चिंचवडमधला प्रकार; चोरटे पसार

रिक्षा चालकावर धारदार शस्त्रानं सपासप वार करत हत्या! नवी मुंबईतील थरारक घटना, चौघांना अटक

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.