Mumbai: पुन्हा 26/11 सारख्या हल्ल्याची भीती? हाच तो धमकीचा मेसेज, नंबरबाबतही मोठा खुलासा

Mumbai News : या सर्व घडामोडींनंतर आता मुंबईत पोलीस सुरक्षा यंत्रण अलर्ट मोडवर आहे. मुंबई ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसंच गुत्पचर यंत्रणा, मुंबई पोलिस यांनी या व्हायरल मेसेजची गंभीर दखल घेतल्याचंही पाहायला मिळतंय.

Mumbai: पुन्हा 26/11 सारख्या हल्ल्याची भीती? हाच तो धमकीचा मेसेज, नंबरबाबतही मोठा खुलासा
धक्कादायक..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 1:23 PM

मुंबई : मुंबई (Mumbai News) हे देशाची आर्थिक राजधानी. तिच्यावर कुणी चुकीच्या नजरेनं पाहिलं, की संपूर्ण देशाची सुरक्षा यंत्रणा सतर्क होते. 26/11 नंतर मुंबईवर हल्ला (26/11 Mumbai Attacked) होण्याची धमकी देणारे तर दूरच पण वाईट नजरेनं पाहणाऱ्यांचीही हयहय गेली जाणार नाही, अशी यंत्रणा मुंबई पोलिसांसह (Mumbai Police) केंद्रीय तपास यंत्रणा आणि सरकारी अधिकारी आणि प्रशासकीय व्यवस्थेनं उभी केली. मुंबई सुरक्षित राहिली. आता पुन्हा एकदा व्हायरल झालेल्या धमकीच्या मेसेजनं पुन्हा मुंबई सतर्क झालीय. यामुळे मुंबईत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. व्हायरल मेसेज ज्या नंबरवर आला आहे. त्या नंबरमध्ये काही फोन नंबर शेअर करण्यात आले आहेत. मुंबईत पुन्हा 26/11 सारखा हल्ला होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. या मेसेजमध्ये देण्यात आलेल्या व्हायरल नंबरपैकी काही नंबरवर टीव्ही 9च्या प्रतिनिधींनी संपर्कही साधला. त्यातूनही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मुंबईत संशयास्पद बॅग आढळल्यानं खळबळ

ज्या मुख्य नंबरवरुन मेजेस मुंबई ट्रॅफिक कंट्रोलला करण्यात आला होता, त्या नंबर संपर्ककेला असता फोन एका माणसानं उचलला होता. त्यानंतर त्याने फोन एका महिलेकडे बोलण्यास सोपवला. या महिलेकडे विचारणा केली असतील त्या महिलेने आपण कोलकातामधून बोलत असल्याची माहिती दिली. दरम्यान, आपण कोणताही मेसेज केलेला नाही, असा दावादेखील केला. तसंच आपण काय करता, असा प्रश्न विचारताच, या महिलेले फोन कट केला. दरम्यान भारतात आणखी असे पाच नंबर आहे, जे मुंबई पोलिसांना पाठवण्यात आले. व्हायरल मेसेजमधील एका नंबरवर फोन केला असता, तो नंबर मूळचा यूपीतील असल्याची माहिती समोर फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने दिली. टीव्ही 9च्या प्रतिनिधींशी बोलताना नेमका फोनवर काय संवाद घडला ते जाणून घ्या..

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

फोनवरील संवाद

प्रतिनिधी- सुरज बोलतोय मुंबईतून

राधामोहन- नही मुंबई से बात नही कर रहा हु

प्रतिनिधी – हा मुझे मालुम है मै मुंबई से बात करा रहा हु आप कहा से बात कर रहे हो

राधामोहन – आप कहा से बात कर रहे हो

आपका नंबर वायरल हो रहा है मेसेज के द्वारा

राधामोहन – हा हा सर मुझे पता चला – लोगो ने बताया मै अभी देखता हु – पता नही कैसे हुआ

प्रतिनिधी- तो आपने कुछ पोलिस केस की ?

राधामोहन – अभी नही सर अभी जाउंगा

प्रतिनिधी- क्योंकी ये मेसेज बडा है- 26 11 हमले को लेके मेसेज किया गया है इसिलिये मै जानना चाहता हु आप कोन हौ क्या करते है

राधामोहन- ऐसा कुछ नही

प्रतिनिधी- आप कहा रहते हो

राधा मोहन – युपी

प्रतिनिधी- तो आप कंप्लेंट करने जा रहे हो.

राधा मोहन- हा मै जा रहा हु कंप्लेट करने

प्रतिनिधी- आपका पुरा नाम क्या है

राधामोहन – राधामोहन

प्रतिनिधी- आप क्या करते हो

राधामोहन – कुछ नही

बंदोबस्त वाढवला

दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर आता मुंबईत पोलीस सुरक्षा यंत्रण अलर्ट मोडवर आहे. मुंबई ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसंच गुत्पचर यंत्रणा, मुंबई पोलिस यांनी या व्हायरल मेसेजची गंभीर दखल घेतल्याचंही पाहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीच श्रीवर्धन येथील हरीहरेश्वरच्या समुद्रकिनारी संशयास्पद बोट आढळून आल्यानंही खळबळ उडाली आहे. आता काही दिवसांतच पुन्हा एकदा मुंबईला धमकी देणारा मेसेजच थेट ट्रॅफिक कंट्रोलला आल्यानं चिंतेत भर पडलीय.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.