Mumbai : 12 व्या मजल्यावरुन कोसळला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं!
मुंबईच्या मध्य उपनगरातील विक्रोळी पूर्वमधील थरारक घटना! बांधकाम सुरु होतं, इतक्यात घडला अनर्थ!
मुंबई : मुंबईत (Mumbai Latest news) 12व्या मजल्यापून पडून कामागाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. जागीच जीव गेलेल्या या कामगाराचं वय 55 वर्ष होतं. या मजुराच्या मृत्यूने (Vikroli Building Tragedy) एकच खळबळ उडाली. दरम्यान या घटनेनं आता बांधकाम करणारे इतर कामागारही धास्तावले आहेत. ही घटना विक्रोळी पूर्व (Vikroli East) परिसरात घडली. एका इमारतीचं बांधकाम सुरु असताना हा दुर्दैवी अपघात घडला. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जाते आहे.
विक्रोळी पूर्व इथं कन्नमवार नगर परिसर आहे. कन्नमवार नगर दोन मध्ये एका इमारतीचं बांधकाम सुरु होतं. मात्र बांधकाम सुरु असताना बाराव्या मजल्यावरुन अजगर अली शेख या 55 वर्षांच्या कामगारावर काळानं घाला घातला.
काम करताना अचानक 55 वर्षीय अजगर अली शेख हे थेट बाराव्या मजल्यावरुन खाली कोसळले. ही घटना इतकी भीषण होती, की त्यांना जबर मार बसून ते जागीच गतप्राण झाले.
या दुर्दैवी घटनेबाबत विक्रोळी पोलिसांनाही कळवण्यात आलं. विक्रोळी पोलिसांनी या 55 वर्षांच्या मजुराचा मृतदेह ताब्यात घेतलाय. हा मृतदेह पुढील तपासणीसाठी राजावाडी हॉस्पिटल इथं रवाना करण्यात आला. सध्या पोलीस या घटनेप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
हा मजूर नेमका कोणत्या कारणामुळे खाली कोसळला, याची चौकशी आता पोलिसांकडून केली जाते आहे. तसंच हा अपघात होता की घातपात होता, याचाही खुलासा करण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.
दरम्यान, या घटनेमुळे बांधकाम मजुरांच्या सुरक्षेचा मुद्दाही आता उपस्थित केला जातोय. याआधीही अनेकदा बांधकाम करताना सुरक्षेची खबरदारी न बाळगल्यामुळे उंचावरुन पडून अनेक मजुरांनी जीव गमावला आहे. मात्र अजूनही म्हणावी तशी मजुरांच्या सुरक्षेबाबत गंभीर पावलं उचलली जात नसल्याचं या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झालंय.