विलेपार्लेत शुल्लक वादातून हत्या! कुत्र्यासोबत मुलगा खेळण्यावरुन भांडण, चाकूहल्ल्यात तरुण ठार

Mumbai Murder : शेखर नायर यांनी शेजारी राहणाऱ्या मुलाचे काका सूरज कनोजिय आणि आजी लक्ष्मी कनौजिया यांच्या धारदार शस्त्रानं हल्ला केला.

विलेपार्लेत शुल्लक वादातून हत्या! कुत्र्यासोबत मुलगा खेळण्यावरुन भांडण, चाकूहल्ल्यात तरुण ठार
जुहूमध्ये हत्याकांडImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 1:00 PM

मुंबई : मुंबईच्या (Mumbai Murder News) पश्चिम उपनगरात एक खळबळजनक हत्याकांड घडलं. शेजारच्यांच्या कुत्र्यासोबत लहान मुलगा खेळण्यावरुन वाद झाला. शेजाऱ्या-शेजाऱ्यांमध्ये झालेल्या या वादातून (Fight in neighbour) लहान मुलाच्या काका आणि आजीवर एकानं प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात 18 वर्षांच्या तरुणाचा जीव (Juhu Murder Case) गेलाय. तर लहान मुलाची आजी जखमी झाली. ही धक्कादायक घटना विलेपार्लेच्या नेहरु नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. सध्या पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय. तसंच हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी संशयित आरोपीला अटकही केलीय. अटक करण्यात आलेल्या आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी केली जातेय.

शुल्लक वादातून हत्या

शुल्लक वादातून झालेल्या हत्याकांडामुळे जुहूच्या नेहरु नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कनोजीया आणि नायर कुटुंब शेजारी शेजारी राहतं. कनोजिया कुटुंबातील एका लहान मुलाच्या कुत्र्यासोबत खेळण्यावरुन वाद झाला. या वादातून शेखर नायर यांनी शेजारी राहणाऱ्या मुलाचे काका सूरज कनोजिया आणि आजी लक्ष्मी कनोजिया यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला. सूरजचं वय 18 वर्ष असून लक्ष्मी कनौजिया यांचं वय 35 वर्ष आहे.

नेमकं काय घडलं?

कुत्र्यासोबत कनौजिया कुटुंबातील लहान मूल खेळत होतं. हे पाहून शेखर नायर यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कनोजिया आणि नायर यांच्यात बाचाबाची झाली. यात मध्यस्थी करण्यासाठी आलेला लहान मुलाचा काका सुरज याच्यावर चाकूने वार केल्यानं त्याला गंभीर जखम होऊन तो ठार झाला. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, अशी माहिती मृत सूरजचा भाऊ दीपक कनोजिया यांनी दिली. दरम्यान, लक्ष्मी कनौजिया या जखमी असून त्यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे सुद्धा वाचा

आरोपी अटकेत

या हत्याप्रकरणी जुहू पोलिसांनी 302, 307, 504, 506 प्रमाणे गुन्हा नोंद करुन आरोपी शेखर नायरला अटक केली आहे. आरोपीचं वय 55 वर्ष असून सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, याआधीही छोट्या छोट्या कारणावरुन शेजाऱ्यांमध्ये भांडणं झाली होती. मात्र आता लहान मुलगा शेजारच्यांच्या कुत्र्यासोबत खेळण्यावरुन सुरु झालेला वाद टोकाला गेला आणि त्यातून सूरजची हत्या करण्यात आल्यानं सगळेच धास्तावलेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.