Mumbai Crime : पत्नीची छेड काढत असल्याचा संशय, मग जे केलं त्यानं परिसर हादरलं
ईश्वरचे आईवडील लहानपणीचं गेले. एका जोडप्याने त्याचा सांभाळ केला. त्यांना एक मुलगी होती. तिचे लग्नही झाले होते.
मुंबई, 30 ऑगस्ट 2023 : ईश्वर मारवाडी हा सतरा वर्षांचा तरुण. लहान असताना आई वडील गेले. एका जोडप्याने ईश्वरचा सांभाळ केला. या जोडप्याला एक मुलगी होती. तिचे लग्न झाले. त्या मुलीच्या पतीने ईश्वरला संपवले. त्याचे कारण समोर आले तेव्हा धक्का बसला. ईश्वर हा मुलीची छेड काढत असल्याचा आरोपीला संशय होता. या संशयातून त्याने ईश्वरला संपवण्याचे ठरवले. थंड डोक्याने विचार केला. त्यानंतर ईश्वरला यमसदनी पाठवले. ही घटना मुंबईच्या चेंबूर वाशीनाका परिसरात घडली.
ईश्वरच्या शरीराचे केले तुकडे
ईश्वर या १७ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. आरोपीने कोयत्याने ईश्वरच्या शरीराचे तुकडे केले. डोके आणि हात वेगळे केले. त्यानंतर शरीर स्वयंपाक घरात पिशवीत ठेवला.
लहानपणीच गेले आईवडील
ईश्वरचे आईवडील लहानपणीचं गेले. एका जोडप्याने त्याचा सांभाळ केला. त्यांना एक मुलगी होती. तिचे लग्नही झाले होते. तिच्या पतीला ईश्वरबद्दल संशय येत होता. ईश्वर माझ्या पत्नीची छेड काढत असल्याचा त्याला संशय होता. या संशयातून त्याने ईश्वरचा काटा काढायचं ठरवलं.
आरोपीला अटक
आरपीएफ पोलिसांनी या प्रकरणी शफी शेख (वय ३३) या व्यक्तीला अटक केली. आरोपीची चौकशी केली जात आहे. क्रूरपणे हत्या करण्याचे कारण त्याला विचारले जाणार आहे. अशी माहिती परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी दिली.
संशयातून केली हत्या
क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने वाशीनाका परिसरात धक्का बसला आहे. हे प्रकरण नेमंक काय आहे, याता अधिक तपास पोलीस करत आहेत. संशयातून हत्या केली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आरोपीकडून माहिती मिळाल्यानंतर या घटनेमागील बारकावे समोर येतील.