वरळीतील स्पा सेंटरमधील हत्येचं गूढ उकललं, प्रेयसीसोबत स्पामध्ये थांबला, आणि…, धक्कादायक माहिती उघड

मृत गुरुसिद्धया वाघमारे हा वरळीत असलेल्या स्पा सेंटरमध्ये त्याच्या प्रेयसीसोबत थांबला असताना त्याच्या मागावर असणाऱ्या आरोपींनी त्याची हत्या केली होती. दोन मारेकऱ्यांनी चॉपर आणि चाकूने त्याची हत्या केल्याची माहिती समोर आली होती. या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे.

वरळीतील स्पा सेंटरमधील हत्येचं गूढ उकललं, प्रेयसीसोबत स्पामध्ये थांबला, आणि..., धक्कादायक माहिती उघड
वरळीतील स्पा सेंटरमधील हत्येचं गूढ उकललं
Follow us
| Updated on: Jul 25, 2024 | 8:38 PM

वरळीतील स्पा सेंटरमध्ये झालेल्या हत्येचं गूढ उकललं आहे. खंडणीच्या त्रासाला कंटाळून दोन स्पा मालकांनी हत्येची सुपारी दिली होती. या स्पा सेंटरमध्ये गुरुसिद्धया वाघमारे या तरुणाची करण्यात आली होती हत्या. आरोपींनी तब्बल 6 लाखांची सुपारी देऊन हत्या केल्याचं समोर आलं आहे. मृत व्यक्ती हा एक सराईत गुंड होता, अशी माहिती समोर आली होती. मृत गुरुसिद्धया वाघमारे याच्यावर 5 गुन्हे दाखल होते. वाघमारे हा वरळीत असलेल्या स्पा सेंटरमध्ये त्याच्या प्रेयसीसोबत थांबला असताना त्याच्या मागावर असणाऱ्या आरोपींनी त्याची हत्या केली होती. दोन मारेकऱ्यांनी चॉपर आणि चाकूने त्याची हत्या केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी वरळी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु होता. अखेर या हत्येत गूढ उकलण्यात वरळी पोलिसांना यश आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत गुरुसिद्धया वाघमारे हा अनेक स्पा मालकांना मागच्या काही वर्षांपासून दर महिन्याला खंडणीसाठी त्रास देत होता. माहिती अर्जाचा आधार घेऊन मृत व्यक्तीकडून अनेक स्पा मालकांना ब्लॅकमेल केल्याच्या आणि त्रास दिल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहे. गुरुसिद्धया वाघमारेची ज्या स्पामध्ये हत्या झाली त्या स्पाच्या मालकाकडून मृत व्यक्ती 8 ते 10 वर्षांपासून खंडणी घेत होता.

स्पा सेंटरच्या मालकाने दरमहा द्याव्या लागणाऱ्या खंडणीला वैतागून हत्येचा कट रचला होता. गुन्हे शाखेकडून 3 तर वरळी पोलिसांकडून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने नालासोपारामधून एकाला आणि राजस्थानच्या कोटामधून 2 आरोपींना अटक केली आहे. वरळी पोलिसांनीही स्पाच्या मालकाला अटक केली आहे.परवा रात्री वरळीच्या स्पामध्ये रात्री एक वाजता वाघमारेची चाकूने हत्या केल्याचं समोर आलं होतं. मुंबई पोलिसांकडून आणखी काही जणांची यामध्ये चौकशी सुरू आहे.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.