मज्जा म्हणून बॉयफ्रेन्डच्या मदतीने तरुणीने शेजारीच केली 9 लाखाची चोरी!

नालासोपाऱ्यातील चोर गर्लफ्रेन्ड बॉयफ्रेन्ड अखेर गजाआड! कशी पकडली गेली चोरी? वाचा

मज्जा म्हणून बॉयफ्रेन्डच्या मदतीने तरुणीने शेजारीच केली 9 लाखाची चोरी!
नालासोपारा येथे चोरीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 10, 2022 | 8:38 AM

पालघर : 23 वर्षीय तरुणीने अल्पवयीन बॉयफ्रेंडच्या मदतीने आपल्याच इमारतीतीतील एका घरात 9 लाखाची चोरी केली. ही घटना नालासोपाऱ्यात उघड झाली आहे. आरोपी तरुणीसह तिच्या अल्पवयीन बॉयफ्रेंडला नालासोपारा पूर्व आचोळा पोलिसांनी अटक केलीय. सध्या दोघांचीही कसून चौकशी सुरु आहे. हर्षिता उदयशंकर गुप्ता (वय 23) असे अटक केलेल्या आरोपी तरुणीचे नाव असून ही नालासोपारा पूर्व एव्हरशाईन लास्ट स्टॉप जवळील रश्मी गार्डन या इमारती मधील रूम न 104 मधील राहणारी आहे.

याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील 202 रूम मधील दिव्या सुरेश पटेल (वय 35) यांच्या घरात 23 नोव्हेंबर रोजी चोरी झाली. त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 9 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.

याबाबत आचोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्या नंतर पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासला. तब्बल 100 च्या वर सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी पडताळले, पण कोणताच सुगावा पोलिसांना लागला नाही. शेवटी तक्रारदार महिलेच्या सोसायटीतील काही संशयित महिला आणि पुरुषांची चौकशी करण्यात आली.

या चौकशीत आरोपी हर्षिता हिच्या जवाबात पोलिसांना संशय आला. त्यातून तिची कसून चौकशी केली असून तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिलाय. आता हर्षिताविरोधात आचोळा पोलीस ठाण्यात भादवी कलम 380, 454, 457, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महिलेनं नवीन घर घ्यायचं असल्याने 8 लाख 36 हजार रुपये रोख रक्कम बेडरूम मधील तिजोरीत आणून ठेवली होती. याच तिजोरीत सोन्याचे दागिने ही होते. आरोपी तरुणी आणि तक्रारदार महिला यांचे एकमेकांच्या घरात येणे-जाणे होते.

नवीन घर घेण्यासाठी घरात पैसे ठेवले असल्याचे या आरोपी तरुणीला माहीत झाले होते. त्यावरून तिने विश्वास संपादन करून, त्यांच्याच घरातील तिजोरीची चावी घेऊन घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा 9 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला आणि मला काहीच माहिती नाही, अशा अविर्भावात ती वागत होती.

या चोरलेल्या पैशातून एक आयफोन, घरातील फ्रीज, के टी एम मोटारसायकल, घरातील फर्निचर अशा महागड्या वस्तूची खरेदी ही केली होती. आरोपी तरुणीने गुन्ह्याची कबुली देताच तिच्याकडून खरेदी केलेल्या वस्तू, सोन्याचे दागिने असा 7 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती ही पोलिसांनी दिली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.