नवी मुंबईत तिघांनी बॉसला घरात घुसून संपवलं, मैदानात बसून खोट्या जबानीचंही प्लॅनिंग

तिघेही आरोपी पोलिसांना तब्बल 8 तास उलटसुलट जबाब देत होते. मात्र सीसीटीव्ही फूटेज तपासून पोलिसांनी अखेर आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. नवी मुंबईत हा धक्कादायक प्रकार घडला

नवी मुंबईत तिघांनी बॉसला घरात घुसून संपवलं, मैदानात बसून खोट्या जबानीचंही प्लॅनिंग
पैशांच्या हिश्श्यावर वादातून बॉसची हत्या
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 9:44 AM

नवी मुंबई : अंमली पदार्थ विक्रीच्या नफ्यातून जास्त हिस्सा घेतल्याने बॉसची हत्या करण्यात आली. तिघांनी आपल्या बॉसला घरात घुसून रॉडने मारुन संपवलं. नवी मुंबईतील वाशी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर तिघांनी पोलिसांना काय सांगायचं, याबद्दल एका मैदानात बसून योजना आखली होती. (Navi Mumbai Fight over money three sub ordinates killed boss)

मयत तरुणाविरुद्ध 15 गुन्हे दाखल

तिघेही आरोपी पोलिसांना तब्बल 8 तास उलटसुलट जबाब देत होते. मात्र सीसीटीव्ही फूटेज तपासून पोलिसांनी अखेर आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हत्या करण्यात आलेल्या जेकब क्रिस्तोपा याच्या विरोधातही विविध पोलीस ठाण्यात 15 गुन्हे दाखल होते.

बॉसच्या हत्येचा कट

अंमली पदार्थ विक्रीच्या नफ्यातून मिळणाऱ्या रकमेचा ठराविक हिस्सा तिघांना दिल्यानंतर उर्वरित रक्कम जेकब क्रिस्तोपा स्वतःला ठेवायचा. परंतु आपल्यापेक्षा जेकब यालाच अधिक नफा मिळतो, ही गोष्ट तिघांनाही खटकत होती. त्यामुळे तिघांनी आपला बॉस जेकबला मारण्यासाठी कट रचला.

घरात लोखंडी रॉडने मारुन हत्या

बॉसच्या घरामध्ये जाऊन त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन हत्या करून तिघे जण पसार झाले होते. हत्या झालेली व्यक्ती सराईत गुन्हेगार असून त्याच्या तीन साथीदारांनी त्याची हत्या केल्याचा सुगावा पोलिसांना मिळाला. त्यामुळे अवघ्या 12 तासात पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणून तिघांना अटक केली आहे.

गोंदियात मजुरांची हत्या

निर्माणाधीन इमारतीत दोन मजुरांची निर्घृण हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार कालच उघडकीस आला होता. गोंदिया शहरातील सिंधी कॉलनी भागात ही घटना घडली. मजूर झोपेत असतानाच त्यांचा जीव घेण्यात आला. हत्येनंतर त्यांच्यासोबत राहणारा मजूर पसार झाला.

झोपेत हत्या, आरोपी पसार

दोन्ही मजूर हे मूळ उतर प्रदेशमधील होते. अमन आणि निरंजन अशी मयत मजुरांची नावं आहेत. तर आरोपी बलवान दोघांची हत्या करुन पसार झाला. गुरुवारी रात्री या नवनिर्मित इमारतीत चार मजूर झोपले होते. यापैकी दोघांची झोपेतच निर्घृण हत्या करण्यात आली. एक मजूर घटनास्थळावरुन पसार झालेला आहे, तर दुसऱ्या मजुराने याची माहिती परिसरातील नागरिकांना दिली.

संबंधित बातम्या : 

नव्या इमारतीत झोपलेल्या दोघा मजुरांची हत्या, आरोपी मजूर पसार

पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी भोवली, पोलिसाकडून सासऱ्यांची गोळी झाडून हत्या

(Navi Mumbai Fight over money three sub ordinates killed boss)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.