गणेश नाईकांच्या खंद्या समर्थकावर कोयता हल्ला, हातावर वार झेलल्याने संदीप म्हात्रे बचावले

संदीप म्हात्रे हे नवी मुंबईतील कोपरखैरणे भागातील समाजसेवक असून भाजप आमदार गणेश नाईक यांचे खंदे समर्थक मानले जातात. संदीप म्हात्रे यांच्या पत्नी माजी नगरसेविका आहेत

गणेश नाईकांच्या खंद्या समर्थकावर कोयता हल्ला, हातावर वार झेलल्याने संदीप म्हात्रे बचावले
संदीप म्हात्रे
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 9:41 AM

नवी मुंबई : भाजपचे दिग्गज नेते गणेश नाईक यांचे खंदे समर्थक असलेल्या संदीप म्हात्रे यांच्यावर हल्ला झाला. संदीप म्हात्रे यांच्या नवी मुंबईतील जनसंपर्क कार्यालयात घुसून दोघा जणांनी कोयत्याने वार केल्याचा आरोप आहे. म्हात्रे यांच्या हाताला जखम झाली असून त्यांच्यावर वाशीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Navi Mumbai Ganesh Naik Supporter Sandeep Mhatre attacked with sickle)

नेमकं काय घडलं

संदीप म्हात्रे हे नवी मुंबईतील कोपरखैरणे भागातील समाजसेवक असून भाजप आमदार गणेश नाईक यांचे खंदे समर्थक मानले जातात. संदीप म्हात्रे यांच्या पत्नी माजी नगरसेविका आहेत. नवी मुंबईच्या सेक्टर 6 मधील म्हात्रेंच्या जनसंपर्क कार्यालयात घुसून दोन जणांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात संदीप म्हात्रे यांनी हातावर वार झेलला, त्यामुळे ते थोडक्यात बचावले आहेत.

हल्ल्याचे कारण अस्पष्ट

संदीप म्हात्रे यांना उपचारासाठी वाशीतील महानगर पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्याचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. एका हल्लेखोराला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या

दरम्यान, शिवसेनेच्या तिवसा शहर प्रमुखाच्या हत्येने कालच अमरावतीत खळबळ उडाली होती. 34 वर्षीय अमोल पाटीलची डोळ्यात मिरचीपूड टाकून डोक्यावर धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तिवसा शहरातील आशीर्वाद वाईन बारसमोर शनिवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती.

नेमकं काय घडलं

अमोल पाटील मित्रासोबत शनिवारी रात्री आशीर्वाद बारमध्ये गेला होता. मात्र बार बंद झाल्याने दोघंही बारसमोर बसले होते. यावेळी दोन ते तीन जणांनी अमोल पाटीलच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. त्यानंतर त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला जागीच ठार केले. त्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी चार जणांना अटक केली.

संबंधित बातमी :

डोळ्यात मिरचीपूड टाकून धारदार शस्त्राने वार, अमरावतीत शिवसेना शहरप्रमुखाची निर्घृण हत्या

शिवसेना शहरप्रमुखाच्या हत्येचा अवघ्या काही तासात उलगडा, निघृणपणे खून करणाऱ्या चौघांना बेड्या

(Navi Mumbai Ganesh Naik Supporter Sandeep Mhatre attacked with sickle)

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.