शामकांत नाईकांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने व्हावा, मुलाचे नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे निवेदन

कोणतीही फौजदारी किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना माझ्या वडिलांच्या चारित्र्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आणि तथ्यहीन असून आज आमची समाजामध्ये बदनामी होत आहे. तरी या संदर्भात नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी सखोल चौकशी करुन हत्येचा तपास योग्य दिशेने करावा आणि नाईक कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी शामकांत नाईक यांचे सुपुत्र शेखर शामकांत नाईक यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

शामकांत नाईकांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने व्हावा, मुलाचे नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे निवेदन
Navi Mumbai Police station
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 12:16 PM

नवी मुंबई : कोणतीही फौजदारी किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना माझ्या वडिलांच्या चारित्र्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आणि तथ्यहीन असून आज आमची समाजामध्ये बदनामी होत आहे. तरी या संदर्भात नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी सखोल चौकशी करुन हत्येचा तपास योग्य दिशेने करावा आणि नाईक कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी शामकांत नाईक यांचे सुपुत्र शेखर शामकांत नाईक यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नेमकं काय?

या संदर्भात शेखर नाईक यांनी त्यांची बाजू मांडताना सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्यांचे वडील शामकांत नाईक (वय-80) यांचा मृतदेह उलवे सेक्टर 19 येथील एका डबक्यात आढळून आला होता. याबाबत पोलिसांनी अधिक तपास करुन तेथील किराणा माल दुकानदार मोहन चौधरी यांना या खुनाबाबत अटक केली. दरम्यान याकाळात मोहन चौधरी यांच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्यानेच शामकांत नाईक यांची हत्या केल्याचे आरोपी मोहन चौधरी यांनी सांगितले. परंतु 80 वर्षीय वृद्ध इसम अशा प्रकारची मागणी कशी करु शकतो? असा सवाल शेखर नाईक यांनी केला आहे.

शेखर नाईक पुढे बोलताना म्हणाले की, माझे वयोवृध्द वडील हे अध्यात्मिक विचारांचे होते. तसेच, माझ्या वडिलांची आतापर्यंत कोणतीही गुन्हेगारी आणि चारित्र्यहीन पार्श्वभूमी नाही. त्यामुळे माझ्यासह माझ्या कुटुंबाची समाजामध्ये असलेल्या प्रतिष्ठेचा भंग करण्यासाठी माझ्या वडीलांवर चुकीचे आरोप करण्यात आलेले आहेत. एकीकडे वडील गेल्याच्या दुःखाचे सावट आम्हा नाईक कुटुंबीयांवर असताना दुसरीकडे स्वर्गीय वडिलांचे चारित्र्य हनन करण्याचे प्रकार समाजमाध्यमातून सुरु आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबीयांची समाजात नाहक बदनामी होत असून संपूर्ण कुटुंब मानसिक तणावातून जात आहे. तरी नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी आम्हा नाईक कुटुंबीयांना न्याय देण्याच्या दृष्टीने या प्रकरणाचा योग्य तपास करून सत्य उजेडात आणावे, अशा मागणीचे निवेदन शेखर नाईक यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहे. तसेच या निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, नवी मुंबई परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल यांना दिली आहे.

त्याचप्रमाणे या गुन्ह्यासंदर्भात आमच्याकडे काही महत्त्वाची माहिती असून, त्यासंदर्भात माहिती संबंधित पोलीस ठाण्यांनाही दिली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्ड यामध्ये असलेली विसंगती, संबंधित पोलीस ठाण्यात वडील हरवल्याची तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी स्वतः आरोपीच्या दुकानाची संपूर्ण पाहणी केली होती, मग त्यावेळी शामकांत नाईक यांचा देह त्याठिकाणी का आढळला नाही? असा सवाल सुद्धा शेखर नाईक यांनी केला आहे. त्यामुळेच सदरचा खून हा आर्थिक लाभासाठी झालेला असल्याचा संशय शेखर नाईक यांनी व्यक्त केला आहे.

या गुन्ह्यातील आरोपी मोहन चौधरी याने पोलिसांना दिलेली माहिती नक्कीच खोटी, खोडसाळ आणि बनाव केलेली आहे. त्यामुळे हा तपास योग्य दिशेने व्हावा आणि आम्हा नाईक कुटुंबीयांना न्याय द्यावा, असेही शेवटी शेखर नाईक यांनी नवी मुंबई पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

बायकोसोबत बेबनावाचा फायदा घेत साहिल खान मला केसमध्ये अडकवतोय, मिस्टर इंडिया मनोज पाटीलच्या पत्रातील आरोप वाचा जसेच्या तसे

पतीच्या उपचारासाठी आलेल्या विवाहितेचा हॉस्पिटलमध्ये विनयभंग, नाशकात खळबळ

सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.