NCB ची नवी मुंबईत मोठी कारवाई, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कराला अटक

आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकिंग नेटवर्क चालविणारा ड्रग तस्कराला नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने म्हणजेच एनसीबीने नवी मुंबईत कारवाई करत अटक केली आहे. स्टीफन सॅम्युअल टोनी असे या ड्रग तस्कराचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून 102 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई करीत असताना टोनी याने एनसीबीच्या अधिकार्‍यांवर हल्ला केला.

NCB ची नवी मुंबईत मोठी कारवाई, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कराला अटक
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 11:10 AM

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज ट्रॅफिकिंग नेटवर्क चालविणाऱ्या ड्रग्ज तस्कराला नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने म्हणजेच एनसीबीने नवी मुंबईत कारवाई करत अटक केली आहे. स्टीफन सॅम्युअल टोनी असे या ड्रग्ज तस्कराचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून 102 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई करीत असताना टोनी याने एनसीबीच्या अधिकार्‍यांवर हल्ला केला. त्यात दोन अधिकारी जखमी झाले असून त्यांच्यावर नवी मुंबईतील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

स्टीफन सॅम्युअल टोनी हा कोकेनचा पॅन इंडियात पुरवठा करत होता. कोलंबियाहून इथिओपिया मार्गे तो मुंबईत कोकेनच्या नेटवर्कमार्फत पुरवठा करण्यात महत्वाचा दुवा आहे. अलिकडेच तो कोकेनच्या पुरवठ्यासाठी दिल्लीहून मुंबईला आला होता. गेल्या काही महिन्यांपासून एनसीबी मुंबईचे अधिकारी त्याच्यावर पाळत ठेवून होते. त्याच्याकडे कोकेन असल्याची माहिती मिळाल्यावर नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर 30 येथे शुक्रवारी पहाटे कारवाई करुन स्टीफन टोनी याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करुन अधिकार्‍यांवर हल्ला केला. त्यात दोन अधिकारी जखमी झाल्यानंतरही पोलिसांनी त्याला जेरबंद करीत त्याच्याकडून 102 ग्रॅम कोकेन जप्त केले.

शासकीय कर्तव्यात सरकारी अधिकार्‍यांना अडथळा आणल्याप्रकरणी स्टीफन सॅम्युअल टोनीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात येत आहे. एनसीबी मुंबईने अंमली पदार्थाच्या तस्करांविरोधात सातत्याने कारवाई केली असून 2021 मध्ये आतापर्यंत 22 परदेशी नागरिकांना अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

ईडीचा पुन्हा दणका; अनिल देशमुखांशी संबंधित तीन ठिकाणांवर धाडी!

मलंगगडला टवाळखोरांची तरुण-तरुणींना मारहाण, तीन अल्पवयीन मुलांसह पाच जण ताब्यात

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.