मॉर्निंग वॉकहून परतलीच नाही, वसईतील बीचवर नवविवाहितेचा मृतदेह आढळला

ममता पटेल असे मृतदेह मिळालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. ती वसईच्या एव्हरशाईन परिसरातील राहत होती. ती मूळ गुजरातमधील नवसारी येथील रहिवासी होती.

मॉर्निंग वॉकहून परतलीच नाही, वसईतील बीचवर नवविवाहितेचा मृतदेह आढळला
मयत ममता पटेल
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 1:44 PM

वसई : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या नवविवाहितेचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वसईच्या किल्ला बंदर समुद्र किनाऱ्यावर 30 वर्षांच्या महिलेचा मृतदेह सापडला. महिलेची हत्या झाली, तिने आत्महत्या केली, की अपघात झाला, याचा आता पोलीस तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे महिलेच्या कुटुंबीयांसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह

ममता पटेल असे मृतदेह मिळालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. ती वसईच्या एव्हरशाईन परिसरातील राहत होती. ती मूळ गुजरातमधील नवसारी येथील रहिवासी होती. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी तिचा विवाह झाला होता. ममता पटेल गेल्या बुधवारपासून बेपत्ता होती.

मॉर्निंग वॉकला गेल्यापासून बेपत्ता

बुधवार सकाळी सहा वाजता ममता मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. याबाबत तुलिंज पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र चार दिवसांनंतर तिचा मृतदेह वसईच्या किल्ला बंदर समुद्र किनाऱ्यावर सापडल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. ममताची हत्या झाली, तिने आत्महत्या केली, की अपघात झाला, याचा आता पोलीस तपास करत आहेत.

लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी, तरुणीची प्रियकरासह आत्महत्या

दरम्यान, नऊ दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या तरुणीने माहेरी येऊन प्रियकरासोबत आत्महत्या केल्याची घटना गेल्याच महिन्यात समोर आली होीत. सासरहून पहिल्यांदा माहेरी आली असताना 19 वर्षांची विवाहिता आधी बॉयफ्रेण्डला भेटली. त्यानंतर दोघांनी गावाबाहेरील पाण्याच्या टाकीत उडी घेऊन आयुष्य संपवलं. पंजाबमधील मुक्तसर साहिबमधील किल्लियावाली गावात ही घटना घडली होती.

संबंधित बातम्या :

धावत्या ट्रेनमध्ये प्रेयसीची चाकू भोसकून हत्या, सात दिवसात तुरुंगात प्रियकराची आत्महत्या

नऊ दिवसांपूर्वीच लग्न, माहेरी येऊन विवाहितेची प्रियकरासोबत आत्महत्या

(Newly Married Vasai woman went for morning walk found dead at Kille Bandar Beach after four days)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.