Mumbai NIA Raid : दाऊदचं नाव, पण निशाण्यावर नवाब मलिक? एनआयएकडून दोघे ताब्यात, दोघेही मलिकांशी संबंधित

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने मोठी कारवाई केली आहे. नागपाडा, भेंडी बाजार, मुंब्रा, भिवंडी, गोरेगाव, बोरीवली, सांताक्रुझ यासारख्या वीसहून अधिक ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या आहेत.

Mumbai NIA Raid : दाऊदचं नाव, पण निशाण्यावर नवाब मलिक? एनआयएकडून दोघे ताब्यात, दोघेही मलिकांशी संबंधित
Dawood Ibrahim Nawab MalikImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 11:53 AM

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (Mumbai NIA Raid) मोठी कारवाई केली आहे. एनआयएने आज मुंबईतील 20 ठिकाणी छापे टाकले आहेत. हे 20 अड्डे दाऊदच्या शार्प शूटर, तस्करांशी संबंधित आहेत. दाऊदचं नाव समोर येत असलं, तरी निशाण्यावर महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) असल्याचं दिसत आहे. मलिक यांचा व्यावसायिक भागीदार सुहेल खांडवानी (Suhail Khandwani) याच्या घरावर एनआयएने छापा टाकला आहे. तर सलीम फ्रुटसह दोघांना एनआयएने ताब्यात घेतलं असून दोघेही मलिक यांच्याशी संबंधित आहेत.

कोण आहे सुहेल खांडवानी?

सुहेल खांडवानी हा मुंबईतील माहिम आणि हाजी अली दर्ग्याचा विश्वस्त आहे. माहिममधील त्याच्या घरी पहाटेपासूनच छापेमारी सुरु आहे. याशिवाय मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित तिघांच्या ठिकाण्यांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या धाडी सुरु असल्याची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

पाहा एएनआयचे ट्वीट

काय आहे प्रकरण?

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने मोठी कारवाई केली आहे. नागपाडा, भेंडी बाजार, मुंब्रा, भिवंडी, गोरेगाव, बोरीवली, सांताक्रुझ यासारख्या वीसहून अधिक ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या आहेत.

एनआयएने आज मुंबईतील 20 ठिकाणी छापे टाकले आहेत. हे 20 अड्डे दाऊदच्या शार्प शूटर, तस्करांशी संबंधित आहेत. याशिवाय अनेक हवाला ऑपरेटर्सवरही छापे टाकण्यात आले आहेत. दाऊद इब्राहिमसाठी हा मोठा दणका मानला जातो.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.