Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : दक्षिण मुंबईत पुन्हा एकदा वृद्ध महिलेवर हल्ला, मात्र दैव बलवत्तर म्हणून…

घरात एकटे असल्याची संधी साधून जेष्ठ नागरिकांवर हल्ला करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. ताडदेवनंतर आता गावदेवी परिसरात वृद्ध महिलेवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

Mumbai Crime : दक्षिण मुंबईत पुन्हा एकदा वृद्ध महिलेवर हल्ला, मात्र दैव बलवत्तर म्हणून...
गावदेवी परिसरात वृद्ध महिलेवर हल्ला
Follow us
| Updated on: Aug 23, 2023 | 5:59 PM

मुंबई / 23 ऑगस्ट 2023 : ताडदेवमधील जेष्ठ नागरिकांवरील हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता गावदेवी परिसरात वृद्ध महिलेवर हल्ला झाला आहे. शमीना इब्राहिम नाकारा असे 68 वर्षीय महिलेचे नाव आहे. गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवालिया टँक येथे सकिना पॅलेस इमातीत ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महेश पानवाल असे महिलेचे नाव आहे. आरोपी महेश महिलेच्या घरी जेवणाचा डब्बा देण्याचे काम करतो. पीडित महिला आपल्या पतीसोबत सकिना पॅलेसच्या तळमजल्यावर राहते. या घटनेमुळे जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पैसे दिले नाही म्हणून हल्ला

शमीना नाकारा यांचे पती शेअर ब्रोकर म्हणून काम करतात. नेहमीप्रमाणे पती कामासाठी गेले होते. तर नाकारा या घरी एकट्या होत्या. नाकारा या महेशकडून रोज टिफिन घेतात. नेहमीप्रमाणे महेश सोमवारी दुपारी टिफिन द्यायला गेला. त्याने दरवाजाची बेल वाजवली. नाकारा यांनी दरवाजा उघडताच महेश आत घुसला. त्याने नाकारा यांच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. मात्र नाकारा यांनी पैसे देण्यास नकार दिला.

वॉचमनमुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पैसे देण्यास नकार दिल्याने महेशने खिशातील चाकू काढला आणि नाकारा यांच्यावर हल्ला केला. मात्र नाकारा यांनी हिंमत दाखवत आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. याचवेळी घरातील आरडाओरडा ऐकून इमारतीच्या वाचमनला नाकारा यांच्या घरी काहीतरी अनुचित घडत असल्याचं लक्षात येताच त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन लावला. नियंत्रण कक्षातून गावदेवी पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी तात्काळ सकिना पॅलेसमध्ये धाव घेत आरोपीला अटक केली.

हे सुद्धा वाचा

आरोपी महेशला त्याच्या मुलाला अकरावीत प्रवेश घ्यायचा होता. यासाठी त्याला पैशांची गरज होती. गेल्या सात वर्षांपासून तो नाकरा यांच्या घरी टिफिन पोहोचवत होता. नाकराने पैशांसाठी अनेकांकडे मदत मागितली होती, मात्र कुणीही त्याला मदत केली नाही. यानंतर त्याने नाकरा यांच्याकडे मदत मागितली, मात्र त्यांनीही दिली नाही. यामुळे संतापलेल्या आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला.

'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला.
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'.
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.