Video : उडुपीतील रुग्णवाहिकेप्रमाणेच पालघरमध्येही अपघात! फरक इतकाच की, सगळे थोडक्यात वाचले, पाहा थरारक व्हिडीओ

Palghar Accident News : पालघरच्या सातपाटी मार्गावर हा भीषण अपघात झाला.

Video : उडुपीतील रुग्णवाहिकेप्रमाणेच पालघरमध्येही अपघात! फरक इतकाच की, सगळे थोडक्यात वाचले, पाहा थरारक व्हिडीओ
पालघरमध्ये अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 11:51 AM

पालघर : उडुपीमध्ये (Udupi Ambulance Accident Video) झालेल्या रुग्णवाहिकेच्या अपघाताचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. अवघ्या काही दिवसांपूर्वी झालेल्या या भीषण अपघाताचा व्हिडीओही अंगावर काटा आणणारा होता. या अपघातामध्ये चार जण ठार झाले होते. टोलनाक्यावर ही रुग्णवाहिका धडकली होती. दरम्यान, आता याच अपघातासारखा आणखी एक अपघात समोर (Palghar Accident CCTV Video) आला आहे. महाराष्ट्रातील पालघरमध्ये अपघाताची ही घटना सोमवारी सकाळी घडली. या दोन्ही अपघातातील फरक म्हणजे उडुपीतील अपघातामध्ये चार जणांचा जीव गेला. तर पालघरमधील अपघातामध्ये सर्व जण अगदी थोडक्यात वाचले आहेत. मात्र दोन्ही अपघातातं सीसीटीव्ही फुटेज काळजाचा थरकाप उडवणार आहं. एक काळी पिवळी इको टॅक्सी (Maruti Suzuki Eco Van) भरधाव वेगानं येतेय. आपली लेन सोडून उजव्या बाजूला असलेल्या खांबाला धडकते आणि जागेवर पलटी होते. धक्कादायक बाब म्हणजे या गाडीत विद्यार्थी होते. दैवं बलवत्तर म्हणून हे सर्व विद्यार्थी बालंबाल बचावलेत.

कुठे झाला अपघात?

पालघरच्या सातपाटी मार्गावर हा भीषण अपघात झाला. चुना भट्टी येथील सोहेल इम्पेक्स कंपनी समोर अपघाताची ही घटना घडली. चाणक्या इंग्लिश हायस्कूलचे विद्यार्थी एका इको वॅनमधून जात होते. यावेळी इको व्हॅन चालकांचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणी ही व्हॅन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्लाय इलेक्ट्रीक पोलला धडकून अपघात झाला.

हे सुद्धा वाचा

यावेळी व्हॅनमध्ये 9 विद्यार्थी होते. हे सर्व विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, या अपघातावेळी समोरुन कोणंतही वाहनं येत नव्हतं, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. अनर्थ मोठी जीवितहानी होण्याची भीती नाकारता येत नाही.

पाहा व्हिडीओ :

या अपघातावेळी थरकाप उडवणारा आवाज झाला. या आवाजाने आजूबाजूची लोकं लगेचच अपघातग्रस्त वाहनाच्या दिशेनं धावली. त्यांनी तातडीनं विद्यार्थ्यांना बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला. भरधाव वेगानं वाहन चालवताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला होता. दरम्यान, ज्या मार्गावर हा अपघात झाला, त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजने हा अपघात किती भीषण होता, याची दाहरकता स्पष्ट केली आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुरुवातील काही दुचाकी आणि गाड्या जाताना दिसतात. मात्र ज्या क्षणी इको कार आपली लेन सोडून रस्त्याच्या उजव्या बाजूला पलटी होते, त्यावेळी दुसरं कोणतंही वाहनं मध्ये न आल्यानं थोडक्यात मोठा अनर्थ टळला. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा प्रयत्न यावेळी सगळ्यांना आला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.