VIDEO : लुडो गेमवरुन चर्चगेट लोकलमध्ये प्रवाशांची हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

भाईंदर ते चर्चगेट लोकलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आज सकाळी 11.30 वाजता भाईंदरवरुन चर्चगेट लोकल सुटली. त्यानंतर मीरा रोड ते दहिसर दरम्यान लोकल येताच लुडो खेळण्यावरुन दोन प्रवाशांमध्ये वाद सुरु झाला. या वादाचे हळूहळू हाणामारीत पर्यावसन झाले. यावेळी लोकलमध्ये उपस्थित अन्य प्रवाशांनी या हाणामारीचे मोबाईलमध्ये चित्रण केले.

VIDEO : लुडो गेमवरुन चर्चगेट लोकलमध्ये प्रवाशांची हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
लुडो गेमवरुन चर्चगेट लोकलमध्ये प्रवाशांची हाणामारी
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 4:14 PM

भाईंदर : लुडो (Ludo) खेळण्याच्या वादातून चर्चगेट लोकल (Churchgate Local)मध्ये दोन प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी दहिसर लोहमार्ग पोलिसांनी हाणामारी करणाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यार कारवाई केली आहे. हाणामारी करणारे लोकलमधील नेहमीचे प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळते. या घटनेबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. (Passengers clash in Churchgate local over ludo game, The video went viral on social media)

गेमवरुन झालेल्या वादाचे हाणामारीत पर्यावसन

भाईंदर ते चर्चगेट लोकलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आज सकाळी 11.30 वाजता भाईंदरवरुन चर्चगेट लोकल सुटली. त्यानंतर मीरा रोड ते दहिसर दरम्यान लोकल येताच लुडो खेळण्यावरुन दोन प्रवाशांमध्ये वाद सुरु झाला. या वादाचे हळूहळू हाणामारीत पर्यावसन झाले. यावेळी लोकलमध्ये उपस्थित अन्य प्रवाशांनी या हाणामारीचे मोबाईलमध्ये चित्रण केले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. याप्रकरणी दहिसर लोहमार्ग पोलिसांनी दोघा प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल करीत दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

उस्मानाबादमध्ये पारधी समाजाच्या दोन गटात मारामारी

उस्मानाबादमध्ये तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे पारधी समाजाच्या 2 गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना आज घडली आहे. हाणामारीत जवळपास 10 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 जण गांभीर जखमी आहेत. तलवार, कोयतासह अन्य हत्यारांनी एकमेकांवर वार करण्यात आले. चिवरी येथील लक्ष्मी देवीच्या यात्रेत हा प्रकार घडला आहे. जखमींवर उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

येवल्यात किरकोळ कारणावरुन दोन गटात हाणामारी

येवला तालुक्यातील कोटमगाव बुद्रुक येथे किरकोळ कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. यावेळी लाकडी दांडक्याचा वापर मारामारी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. किरकोळ कारणावरून दोन गटात भांडणे झाली होती. भांडणे सोडविण्यास गेलेल्या काही जणांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने ते जखमी झाले आहेत. किरकोळ भांडणाचे परिवर्तन दोन गटांच्या तुंबळ हाणामारी झाल्याने संदर्भात येवला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी 8 जणांना अटक केली असून अधिक तपास करीत आहे. (Passengers clash in Churchgate local over ludo game, The video went viral on social media)

इतर बातम्या

मंत्री नवाब मलिकांना ईडीकडून अटक, पुढे काय होणार? उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया…

धक्कादायक ! पुणे बोर्डाचे गोपनीय कागदपत्रं घेऊन जाणारा टेम्पो आगीच्या भक्षस्थानी ; 12वी परिक्षेच्या प्रश्नपत्रिका असल्याची खात्रीलायक माहीती 

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.