‘तो’ तिच्यावर सपासप वार करत राहिला आणि गर्दीतले लोकं फक्त पाहत राहिले, वसईत नेमकं काय घडलं?

आरोपी खाली वाकून मुलीला तू का असं केलंस? असं विचारतो. यावेळी एक महिला आरोपीच्या बाजूला उभी राहते. ती नेमकं काय घडत आहे ते सर्सासपणे बघत असते. पण ती त्या मुलीला वाचवण्यासाठी पुढे जात नाही. याउलट ती तिथे उभी राहून पाहत असते. आरोपी मृत तरुणीला का केलंस? असं विचारल्यानंतर पुन्हा तिच्यावर वार करतो.

'तो' तिच्यावर सपासप वार करत राहिला आणि गर्दीतले लोकं फक्त पाहत राहिले, वसईत नेमकं काय घडलं?
'तो' तिच्यावर सपासप वार करत राहिला आणि गर्दीतले लोकं फक्त पाहत राहिले
Follow us
| Updated on: Jun 18, 2024 | 6:00 PM

काही घटना या सुन्न करणाऱ्या असतात. या घटनांवर कसं व्यक्त व्हावं हे आपल्याला समजत नाही. विशेष म्हणजे या घटना खुलेआम सर्वांसमोर घडतात तेव्हा मेंदू छिन्नविछन्न होतो. वसईत आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडलेली घटनादेखील तशीच आहे. ही घटना एखाद्या वाईट स्वप्नासारखी किंवा बॉलिवूडच्या हॉरर चित्रपटासारखी वाटू शकते. पण ही घटना घडली हे वास्तव आहे. या घटनेत बघ्यांची भूमिका घेणारे लोकं, घटनेचा व्हिडीओ काढणारी माणसं ही मुळात माणसं आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय. अतिशय सुन्न करणारी सारं काही आहे. घटना घडली तेव्हा अनेकांनी मुलीच्या मदतीला धावून जाणं आवश्यक होतं. त्यामुळे कदाचित मुलीचे प्राण वाचले असते. पण तसं घडलं नाही. नराधम तरुण मुलीवर सपासप वार करत राहिला आणि लोक फक्त पाहत राहिले. विशेष म्हणजे लोक या तरुणाच्या अगदी बाजूला होते. पण ते त्याला रोखू शकले नाहीत. यापेक्षा वाईट काय असू शकतं? असा प्रश्न आता निर्माण होतोय.

संबंधित घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मृत मुलगी ही कामावर निघालेली होती. आरोपी मागून येऊन तिच्या डोक्यावर लोखंडी पान्याने वार करतो. तो मुलीवर सपासप एकापाठोपाठ अनेक वार करतो. या हल्ल्यामुळे तरुणी रसत्यावर धारातीर्थ पडते. आरोपीच्या हल्ल्यात पीडितेचा मृत्यू होतो. तरुणी रस्त्यावर धारातीर्थ पडल्यानंतरही तो तिच्यावर वार करतो. याउलट तो तिला तू असं का केलंस? असे प्रश्न जोरजोरात विचारतो. हा सर्व प्रकार रस्त्याने ये-जा करणारी लोकं पाहत असतात. पण कुणीही मुलीच्या मदतीसाठी पुढे धजावत नाही.

एक व्यक्ती आरोपीला रोखण्याचा प्रयत्न करतो, पण…

आरोपी पीडितेवर सुरुवातीला जेव्हा वार करतो तेव्हा एक व्यक्ती त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो. तो आरोपीला रोखण्याचा प्रयत्न करतो. पण आरोपी नराधम हा लोखंडी पाना घेऊन त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे मुलीला वाचवण्यासाठी पुढे आलेला व्यक्ती बाजूला होतो. यानंतर कुणीही मुलीच्या वाचवण्यासाठी पुढे येत नाहीत. याउलट ते मुलीची हत्या होताना पाहत असतात. काही लोकं रस्त्यावर थांबून हे सर्व पाहत असतात. तर काही लोकं रस्त्याने ये-जा करत असताना घटना पाहून काहीच घडलं नाही, असं मानत पुढे निघून जातात.

या घटनेचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. आरोपी खाली वाकून मुलीला तू का असं केलंस? असं विचारतो. यावेळी एक महिला आरोपीच्या बाजूला उभी राहते. ती नेमकं काय घडत आहे ते सर्सासपणे बघत असते. पण ती त्या मुलीला वाचवण्यासाठी पुढे जात नाही. याउलट ती तिथे उभी राहून पाहत असते. आरोपी मृत तरुणीला का केलंस? असं विचारल्यानंतर पुन्हा तिच्यावर वार करतो. यावेळी त्याच्या आजूबाजूला तुडुंब गर्दी असते. पण कुणीही तिला वाचवण्यासाठी पुढे येत नाहीत. यापेक्षा मोठं दुर्दैवं काय असू शकतं? अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरु आहे.

आरोपीने तरुणीची हत्या का केली?

संबंधित घटनेतील आरोपीचं नाव रोहित यादव असं आहे. त्याचं मृतक आरती यादव या 20 वर्षाच्या तरुणीवर प्रेम होतं. दोन्ही रिलेशनशिपमध्ये होते. पण काही दिवसांपूर्वी आरतीने ब्रेक अप केलं होतं. त्यामुळे आरोपी रोहितला आरतीचं दुसऱ्या कुणासोबत प्रेम प्रकरण असल्याचा संशय आला. यातून आरोपीने रागाच्या भरात भर रस्त्यात आरतीची हत्या केली. आरोपीला वसईच्या वाळीव पोलिसांनी अटक केली आहे. पण या घटनेमुळे वसईसह संपूर्ण मुंबई सुन्न झाली आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.