रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाच्या खिशातील महागडा मोबाईल अचानक गायब, गाडीतच चोरटा सापडला आणि…………..
एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना कल्याण जीआरपीने अटक केली आहे (Police arrest two youth who stole passengers mobile in train).
कल्याण (ठाणे) : एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना कल्याण जीआरपीने अटक केली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही चोरट्यांकडून एक्सप्रेसमध्ये चोरीचे 11 मोबाईल पोलिसांनी हस्तगत करण्यात आले आहेत. त्यानंतर आता पोलिस ज्यांचा मोबाईल चोरीला गेला आहे त्यांचा शोध घेत आहेत जेणेकरुन त्यांना मोबाईल देता येईल (Police arrest two youth who stole passengers mobile in train).
नेमकं काय घडलं?
शुक्रवारी (18 जून) पहाटे मुंबईकडे येणाऱ्या मंगला एक्सप्रेमधून प्रवास करणारे सगीर अहमद यांचा मोबाईल अचानक चोरीस गेला. जेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यांचा मोबाईल चोरीस गेला तेव्हा त्यांनी शोधाशोध सुरु केली. ट्रेन सुरुच होती. महागडा मोबाईल चोरीस गेल्याने सगीर अहमद हे अस्वस्थ झाले. ही बाब त्यांनी गाडीतील इतर प्रवाशांना सांगितली. प्रवाशांनी बोगीतच झाडाझडती सुरु केली. यावेळी एक संशयित तरुण प्रवाशांच्या हाती लागला (Police arrest two youth who stole passengers mobile in train).
प्रवाशांनी संशियताला पोलिसांच्या तब्यात दिलं
सगीर अहमद यांच्यासह अन्य प्रवाशांनी या संशयीत तरुणाला पकडून कल्याण रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. हसन शेख उर्फ अरबाज शेख असे या तरुणाचे नाव होते. या तरुणाला ताब्यात घेत कल्याण रेल्वे पोलिसांनी चौकशी सुरु केली. अखेर सगीर अहमद यांचा चोरीस गेलेला महागडा मोबाईल हसन उर्फ अरबाजकडेच सापडला.
पोलिसांची प्रतिक्रिया
या प्रकरणावर कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक वाल्मीक शादरूल यांनी प्रतिक्रिया दिली. “पोलीस खाक्या दाखविताच अरबाज याने कबूली दिली. त्याचा आणखी एक अन्य साथीदार आहे. त्याच्यासोबत तो हे काम करतो”, असं शादरूल यांनी सांगितलं.
आरोपीच्या दुसऱ्या साथीदाराला मुंब्र्यातून बेड्या
आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अन्य चोरट्याला मुंब्रा येथून ताब्यात घेतले. त्याचे नाव तसलीम शेख असे आहे. हे दोघेही मुंब्रा येथेच राहतात. धक्कादाय म्हणजे या दोघांनी मिळून एक्सप्रेस गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तब्बल 11 मोबाईल लंपास केले होते. आतापर्यंत फक्त चार प्रवाशांची नावे समोर आली आहेत, ज्यांचे मोबाईल चोरीस गेले होते. अन्य मोबाईल कोणाचे आहेत त्याचा शोध सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा : आधी मायलेक, आता पतीचाही मृतदेह, काय घडलं ‘त्या’ रात्री? गूढ आणखी वाढलं