हिरे व्यापाऱ्याकडे ‘एवढ्या’ खंडणीची मागणी, गुन्हे शाखेने ‘अशी’ वळली बोगस कस्टम अधिकाऱ्यांची गठडी

गुजरातमधील एका हिरे व्यापाऱ्याने त्याच्याकडे काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या हातून 3 कोटी 5 लाख 19 हजार रुपयांचे हिरे दुबईला पाठवले होते.

हिरे व्यापाऱ्याकडे 'एवढ्या' खंडणीची मागणी, गुन्हे शाखेने 'अशी' वळली बोगस कस्टम अधिकाऱ्यांची गठडी
हिरे व्यापाऱ्याकडे खंडणी मागणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 8:06 PM

मुंबई / गोविंद ठाकूर (प्रतिनिधी) : कस्टम अधिकारी असल्याचे भासवून हिरे व्यापाऱ्याकडे 80 लाखांची खंडणी (Ransom) मागणाऱ्या आरोपींना मुंबई क्राइम ब्रँच युनिट 12 ने बेड्या ठोकल्या आहेत. दोन बोगस कस्टम अधिकाऱ्यां (Bogus Custom Officer)सह हिरे व्यापाऱ्याकडे काम करणारा एक कामगार अशा एकूण तीन आरोपींना पोलीस पथकाने अटक (Arrest) केली आहे. विजय हिम्मतभाई हिरपारा, रवी अरविनभाई घोघरी आणि किसन पुरुषोत्तमभाई शिरोया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघेही आरोपी गुजरातमधील सुरतचे रहिवासी आहेत.

हिरे व्यापाऱ्याने नोकराच्या हातून दुबईला हिरे पाठवले

गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील एका हिरे व्यापाऱ्याने त्याच्याकडे काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या हातून 3 कोटी 5 लाख 19 हजार रुपयांचे हिरे दुबईला पाठवले होते.

आपल्याला कस्टम अधिकाऱ्यांनी पकडल्याचे नोकराने मालकाला सांगितले

पण हिरे व्यापाऱ्याच्या माणसाने दुबईला न जाता त्याच्या मालकाला फोन करून कळवले की, त्याला कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले आहे आणि त्याला सोडण्यासाठी 80 लाखांची मागणी करत आहे.

हे सुद्धा वाचा

बोगस कस्टम अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन दहिसरमध्ये बोलावले मालकाला

एवढेच नव्हे तर अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी दोन आरोपींनी स्वत:ला कस्टम विभागाचे अधिकारी सांगत हिरे व्यापाऱ्याशी फोनवर बोलून पैसे देण्यासाठी दहिसर येथील हॉटेलमध्ये बोलावले.

क्राईम ब्रांचने आरोपींना रंगेहाथ पकडले

त्यानंतर क्राइम ब्रँच युनिट 12 च्या टीमला हिरे व्यापाऱ्याने या संपूर्ण घटनेची माहिती दिली आणि गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकून तीन आरोपींना रंगेहाथ अटक केली.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.