भर पावसात भरधाव कारवर स्टंटबाजी करणं भोवलं, हिललाईन पोलिसात गुन्हा दाखल

कल्याणच्या मलंगगड रस्त्यावर एका कारमध्ये बसून जीवघेणी स्टंटबाजी करणे चार तरुणांना महागात पडलं आहे (Police file FIR against youths who stunt on car during heavy rain).

भर पावसात भरधाव कारवर स्टंटबाजी करणं भोवलं, हिललाईन पोलिसात गुन्हा दाखल
तरुणांचं जीवघेणं स्टंट, हिललाईन पोलीस ऑन अ‍ॅक्शन मोड, गुन्हा दाखल, कडक कारवाईची शक्यता
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 5:51 PM

कल्याण (ठाणे) : कल्याणच्या मलंगगड रस्त्यावर एका कारमध्ये बसून जीवघेणी स्टंटबाजी करणे चार तरुणांना महागात पडलं आहे. हिललाईन पोलिसांनी या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरु केली आहे. मुंबई, ठाण्यात 9 जून रोजी पहिल्याच पावसाने थैमान घातलं. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. याच दिवशी भर पावसात काही तरुण भरधाव कारने स्टंटबाजी करत होते. त्यांच्या या स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांच्या स्टंटबाजीबद्दल ‘टीव्ही 9 मराठी’ने वृत्त प्रदर्शित केले होते. या बातमीची दखल घेऊन पोलिसांनी अखेर स्टंबाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाई केली आहे (Police file FIR against youths who stunt on car during heavy rain).

अखेर पोलिसांना तरुणांना ओळखण्यात यश

कल्याण डोंबिवलीत बुधवारी एकीकडे जोरदार पाऊस सुरु होता, दुसरीकडे कल्याण मलंगगड रस्त्यावर काही तरुण एका कारमध्ये बसून स्टंटबाजी करत होते. त्यांचा स्टंटबाजीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ने वृत्त प्रदर्शित केलं. उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी या बातमीची दखल घेऊन स्टंटबाज तरुणांचा शोध सुरु केला. अखेर पोलिसांना या तरुणांना ओळखण्यात यश आलं आहे (Police file FIR against youths who stunt on car during heavy rain).

पोलिसांची प्रतिक्रिया

“स्टंटबाज करणारे चौघे तरुण कल्याण ग्रामीणमधील हेदूटणो गावात राहतात. वैभव भंडारी, प्रवीण भंडारी, आनंद भंडारी आणि आकाश भोपी अशी या तरुणांची नावे आहेत. या चौघांना हिललाईन पोलिसांकडून नोटीस देण्यात आली”, अशी माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मोहन खंडारे यांनी दिली आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत नेमकं काय?

व्हायलर होणाऱ्या व्हिडीओत रस्त्याने एक कार भरधाव वेगाने धावताना दिसत आहे. या कारच्या पुढच्या काचेला लटकून एक तरुण बोनेटवर दोघे पाय ठेवून उभा आहे. एका तरुणाच्या हातात गाडीची स्टेअरिंग आहे. तर इतर दोन तरुण गाडीतील खिडकीतून बाहेर दरवाज्यावर बसले आहेत. तिघं मोठ्या आवाजात ओरडून जल्लोष करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आणखी दोन तरुण स्कुटीवर आहेत. ते या संबंध प्रकाराचा व्हिडीओ काढताना दिसत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्बंध असाताना संबंधित प्रकार

विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात धरण परिसर, धबधबा किंवा नदी किनाऱ्यावर, घाट परिसर किंवा तलाव परिसरात जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. राज्यात कोरोनाचं संकट आहे, त्यात पावसाळ्यात तलाव, नदी, धरण किंवा धबधबा परिसरात जावून अनेक जण वाहून गेल्याच्या दुर्घटना याआधीच घडल्या आहेत. याशिवाय या परिसरांमध्ये शेकडो पर्यटकांची गर्दी होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सचं पालन होणार नाही. त्याचबरोबर कोरोनाचा संसर्गही वाढू शकतो. त्यामुळेच ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी अशा परिसरात फिरण्यास बंदी घातली आहे. अशा परिसरांपासून एक किमी अंतरावर कोणत्याही वाहनास प्रवास करण्यास मनाई करण्यात आलं आहे. पण फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यातून वगळण्यात आलं आहे.

तरुणांचा स्टंटचा व्हिडीओ बघा :

संबंधित बातम्या :

VIDEO : एकाच्या हातात स्टेअरिंग, दोघांचं अर्ध धड बाहेर, तिसरा थेट पुढच्या काचेला लटकलेला, तरुणांचं जीवघेणं स्टंट

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.