एकनाथ खडसेंची पत्नी मंदाकिनींनाही ईडीचे समन्स, जावयाच्या अटकेनंतर सासू-सासरे रडारवर

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र त्यांनी निवेदन देऊन वेळ मागितली आहे.

एकनाथ खडसेंची पत्नी मंदाकिनींनाही ईडीचे समन्स, जावयाच्या अटकेनंतर सासू-सासरे रडारवर
एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 7:34 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची ईडी कार्यालयात तब्बल 9 तास चौकशी झाली. पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर खडसेंची चौकशी करण्यात आली. खडसेंसोबतच त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावलं होतं, अशी माहिती समोर येत आहे. मात्र मंदाकिनी यांनी अंमलबजावणी संचलनालयाकडे वेळ वाढवून मागितली आहे. (Pune Bhosari MIDC Land Scam NCP Leader Eknath Khadse wife Mandakini Khadse also summoned by ED for inquiry)

पत्नीलाही ईडीचे समन्स

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. एकनाथ खडसेंच्या चौकशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 7 जुलै रोजी मंदाकिनी यांना हजर राहण्याचे आदेश होते. मात्र त्यांनी निवेदन देऊन 14 दिवसांची वेळ मागितली आहे. परंतु ईडीने त्यांना अजून कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

खडसेंची 9 तास ईडी चौकशी

दरम्यान, एकनाथ खडसे गुरुवारी (8 जुलै) सकाळी 11 वाजताच्या सुमारास ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. 9 तासांच्या चौकशीनंतर रात्री आठच्या सुमारास ते कार्यालयाबाहेर पडले. यावेळी एकनाथ खडसे यांनी स्वतः माध्यमांशी बोलणं टाळलं. चौकशी झाल्यावर ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर ते थेट आपल्या गाडीत बसून रवाना झाले. त्यांच्या वकिलांनी माध्यमांना या चौकशीची माहिती दिली. यावेळी वकिलांनी ईडी चौकशीसाठी जितक्या वेळा बोलावेल तितक्या वेळा हजर राहण्याचं खडसेंनी आश्वासन दिल्याचं सांगितलं.

एकनाथ खडसे यांचे वकील काय म्हणाले?

“ईडीच्या कार्यालयात एकनाथ खडसे यांची चौकशी झाली. चौकशीत आम्ही सर्व प्रकारचं सहकार्य केलं. यावेळी त्यांच्या संपत्तीची संपूर्ण चौकशी करण्यात आली. ईडीने स्टेटमेंट्सची सत्यता तपासली. याशिवाय ईडीला जी कागदपत्रं हवी होती ती सगळी दिली आहेत. ईडीला आणखी काही कागदपत्रं हवी होती, ती 10 दिवसात जमा करण्यास सांगितलं आहे. ईडीला जेव्हा चौकशीसाठी आमची गरज लागेल तेव्हा तेव्हा आम्ही यायला तयार आहोत, असं ईडीला सांगितलंय. ईडीने पैशांच्या व्यवहाराबाबत, तसंच भोसरीतील जमिनीबाबतही चौकशी केली. खडसे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.” असं एकनाथ खडसे यांचे वकील म्हणाले

चौकशीपूर्वी खडसे काय म्हणाले होते?

या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येतोय. मी पक्ष बदलला. भाजप सोडून राष्ट्रवादीत आलो. त्यानंतर माझ्या चौकश्या सुरू झाल्या. राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे. नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र सुरू आहे, असं सांगतानाच जळगावमध्ये व्हॉट्सअॅपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर अभी कुछ होनेवाला है असा मेसेज फिरत आहे. यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं दिसून येत आहे. पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असं खडसे म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

“जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटकेची शक्यता”

“ईडी बोलावेल तेवढ्या वेळा हजर राहू”, अटक टाळण्यासाठी एकनाथ खडसे यांचं आश्वासन?

(Pune Bhosari MIDC Land Scam NCP Leader Eknath Khadse wife Mandakini Khadse also summoned by ED for inquiry)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.