Sheena Bora Murder : शीना बोरा हत्याकांड, राहुल मुखर्जीकडून परमबीर सिंग यांच्या नावाचा उलगडा; वाचा जबाबात काय म्हटलंय ?

राहुलची पुढील साक्ष 17 जून रोजी होणार आहे. पुढच्या सुनावणीत आणखी महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. शीना बोरा आणि राहुल मुखर्जी या दोघांनी वर्ष 2011 मध्ये देहरादूनमध्ये साखरपुडाही केला होता, असे राहुल मुखर्जीने विशेष सीबीआय कोर्टात सांगितले.

Sheena Bora Murder : शीना बोरा हत्याकांड, राहुल मुखर्जीकडून परमबीर सिंग यांच्या नावाचा उलगडा; वाचा जबाबात काय म्हटलंय ?
राहुल मुखर्जीकडून परमबीर सिंग यांच्या नावाचा उलगडाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 12:04 AM

मुंबई : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या शीना बोरा (Sheena Bora) हत्याकांड प्रकरणात आज राहुल मुखर्जी (Rahul Mukharji)ची मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय कोर्टात साक्ष नोंदवण्यात आली. आपल्या जबाबात राहुल याने आरोपी आणि इंद्राणी मुखर्जीचा दुसरा पती संजीव खन्ना याला ओळखल्याचे म्हटले आहे. तसेच शीना मिसिंग झाल्याची माहिती सर्वप्रथम माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांना मिळाल्याचाही खुसालाही राहुलच्या जबाबावरुन झाला आहे. शीना मिसिंग झाल्याचे राहुलने त्याच्या आईला कळवले. मग त्याच्या आईने तिच्या मित्राला याबाबत सांगितले होते. या मित्राने परमबीर सिंग यांच्याशी याबाबत बोलणे केले. त्यानंतर राहुलनेही परमबीर सिंग यांना कॉल केला असता त्यांनी शीनाची मिसिंग तक्रार देण्यास सांगितल्याचे राहुलने म्हटलंय.

राहुलची पुढील साक्ष 17 जून रोजी होणार आहे. पुढच्या सुनावणीत आणखी महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. शीना बोरा आणि राहुल मुखर्जी या दोघांनी वर्ष 2011 मध्ये देहरादूनमध्ये साखरपुडाही केला होता, असे राहुल मुखर्जीने विशेष सीबीआय कोर्टात सांगितले. राहुलने आपल्या जबाबात काय म्हटलंय हे त्याचाच शब्दात वाचा.

विशेष सीबीआय कोर्टात राहुल मुखर्जीने दिलेला जबाब पुढीलप्रमाणे

  • शीना बोरा ही तिचा मित्र कौस्तुबसोबत बेंगलोरला राहत होती.
  • शीनाचा लहानपणीचा मित्र प्रणय उर्फ चिंकू हा गुवाहटीचा आहे आणि हे शिक्षणासाठी बेंगलोरला एकत्र राहत होते.
  • मे च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात राहुल बेंगलोरला गेला होता. त्यावेळी त्याने पाहिलं की शिनाला तिच्या पायावर उभं राहता येत नव्हतं.
  • या संदर्भात राहुलने विचारलं त्यावेळी डॉक्टरांनी औषध दिली असून ती औषध घेतल्यानंतर काही क्षणातच शीनाची तब्येत बिघडल्याचे त्याला कळले. मोलिया रुग्णालयात हा प्रकार घडला होता.
  • मी इंटरनेटवर तिला देण्यात आलेल्या औषधांबाबत चौकशी केली. तेव्हा ती औषध ‘एन्टीसायकॉटीक ” असल्याचे कळले. मी माझ्या आईला फोन करून या घटनेची माहिती दिली.
  • आईने तिच्या ओळखीच्या एका डॉक्टरकडे पाठवलं. डॉक्टरला आम्ही औषधं दाखवल्यानंतर त्यांनाही धक्का बसला. त्यांनी ही औषध न घेण्याचा सल्ला दिला. त्याऐवजी त्यांनी दुसरी औषधे दिली.
  • त्यानंतर मी बेंगलोरलाच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. शीना गुवाहाटी येथे इंद्राणीकडे गेली. मी देहरादूनला आजी आजोबांकडे गेलो जे माझा आईचे आईवडिल आहेत.
  • मी देहरादूनला 5 आठवडे थांबलो. त्यावेळी शीना आजारपणातून बरी होत होती. त्याचवेळी शीना हिला रिलायन्स मुंबई येथे नोकरी मिळाली. तेथे तिने काही दिवसांपूर्वी अर्ज केला होता. नोकरीसाठी बोलावणयात आल्याने ती आनंदी होती.
  • त्यानुसार शीना नोकरीसाठी मुंबईला होती. ती अंधेरी लोखंडवाला येथे वास्तव्यास होते. राहण्यासाठी ते योग्य आणि सुरक्षित होते. तसेच कार्यालयापासून ते जवळ होते.
  • शीनाचे कार्यालय आरे कॉलनी परिसरात होते. मी ही दोन रात्र त्या खोलीत राहिलो. त्यानंतर गोरेगाव पूर्व मैत्रीपार्क येथे आम्ही शिफ्ट झालो. तेथे आम्ही 4 ते 6 महिने राहिलो.
  • या काळात शीना आणि इंद्राणी दोघांमध्ये ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये शाब्दिक वाद झाले. शीनाला विधीच्या ईमेल अकाऊन्टवरुन मेल आले होते. त्यावेळी शिनाने विधीशी संपर्क साधला असता विधीने मला याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर शीनाने इंद्राणीला रागात फोन केला होता.
  • फोनवर काही तास भांडण सुरू होतं. या दरम्यान शीनाच्या मोबाइलची बॅटरी संपली. मग तिने माझ्या फोनवरून इंद्राणीला मेसेज केले.
  • या भांडणानंतर तिने इंद्राणी आणि पिटर यांच्याशी बोलणं सोडलं. मी खरंच आनंदी होतो की त्यांच्याशी तिने बोलणं सोडलं.
  • 2010 शांततेत गेलं. शीना तिच्या कामात आनंदी होती. मी मॉडेलिंग अॅक्टिंग करत होतो.
  • मार्चच्या पहिल्या आठवड्यात 2011 मध्ये चुलत बहिण श्रीपर्णचे लग्न गोव्याला होते. तिने आम्हा सर्वांना लग्नाचे निमंत्रण दिले होते.
  • आम्ही या लग्नाला गेलो. 2010 मध्ये मला माझा वडिलांनी इंद्राणीला माहिती न होता पैसे अभिनेता अनुपम खेर अॅक्टिंग कोर्ससाठी दिले.
  • लग्न समारंभात मी वडिलांना कुटुंबातील इतर सदस्यांसोबत बसलेले पाहिले. मी त्यांची गळाभेट घेण्यासाठी हात लांब केले. पण त्यावेळी त्यांनी इंद्राणीकडे पाहिलं आणि गळाभेट टाळली.
  • त्यानंतर लग्न समारंभात आम्ही इंद्राणी आणि वडिलांना भेटणं टाळलं.
  • त्यानंतर विधीने शीनाला मेसेज करून इंद्राणी रागात असून ती त्यांच्याशी संबध तोडण्याच्या गोष्टी करत आहे, असे सांगितले
  • दिवाळी 2011 साली आम्ही देहरादून येथे साखरपुड्याचं निमंत्रण इंद्राणीलाही दिले.
  • साखरपुड्यानंतर आम्ही मुंबईला आलो. त्यावेळी शीनाला पुढील शिक्षण लंडनच्या यूनिवर्सिटीतून एमबीए कोर्स करायचा होता.
  • 2012 मध्ये शीनाने इंद्राणी यांच्याशी संपर्क साधला. तसेच पुढील शिक्षणासाठी आणि प्रवासासाठी पैसे मागितले.
  • त्यानंतर दोघींनी एप्रिल 2012 मध्ये भेटण्याचे ठरवले. त्यानुसार विमानतळाजवळील पंचताराकिंत हॉटेल येथे दोघींची भेट ठरली होती. मी शीनाला तेथे सोडले. काही तासांनी मी शीनाला त्याच हॉटेलमध्ये घ्यायला आलो.
  • त्यावेळी शीनाने मला सांगितले की, इंद्राणीची वागणूक बदलली असून ती आता आपल्या दोघांच्या संबंधांना हरकत असल्याचे बोलत होती.
  • त्यानंतर एप्रिल 2012 मध्ये दुसऱ्यांदा भेटण्याचे ठरवले. तेव्हा आम्ही साकीनाका परिसरात राहत होतो. त्या ठिकाणचा करार आम्ही दोघांच्या नावाने केला होता.
  • 24 एप्रिल 2012 ला दोघींनी पुन्हा एकदा भेटायचं ठरवलं होतं. मी शीनाला कामावरून घेऊन वांद्रे येथील भेटण्याच्या ठिकाणी लिंक रोडवरील अमर सन्स शॉप बाहेर सोडले.
  • दुपारी 4.30 वाजता मी साकीनाकाहून निघालो. प्रचंड वाहतूक कोंडी होती. इंद्राणी आणि शीना या दोघीही या दरम्यान फोनवर कुठे भेटायचं याबाबत संपर्कात होत्या.
  • मी 6.30 ते 6.40 दरम्यान पोहचलो. सिल्वर कलरच्या गाडीने इंद्राणी आली होती. माझी गाडी अमर सन्स शॉपच्या समोर होती. इंद्राणीसोबत ड्रायव्हर श्याम राय आणि एक जण होते.
  • गाडीतून उतरून शीना त्यांच्या गाडीच्या दिशेने गेली. मी इंद्राणीचा ड्रायव्हर श्याम याला अनेक वर्षापासून ओळखतो.
  • पण मी इंद्रायणी सोबत एक व्यक्ती पाहिला होता. तो संजीव खन्ना असल्याचे मला हत्येनंतर पोलिसांकडून ओळखपरेड सुरू होती त्यावेळी कळलं
  • मी शीनाला मेसेज करून कसे सुरू आहे विचारलं, तिने ठिक सुरू आहे म्हटलं. आम्ही हॉटेल रॉयल चायना येथे जेवायला निघालो असल्याचे सांगितले.
  • मग मी पुन्हा मेसेज करून घ्यायला कधी येऊ असे विचारले. त्यावेळी तिने मी इंद्राणीसोबत चांगला वेळ घालवत आहे असे सांगितले. मग मी तिला सकाळी घ्यायला येतो काळजी घे असा मेसेज केला.
  • दुसऱ्या दिवशी सकाळी मी शीनाला फोन केला. त्यावेळी तिने मला एक चांगला मुलगा भेटला असून मला संपर्क करू नको असे सांगितले.
  • मी शीनाला मला एक फोन करण्यासंदर्भात मेसेज केला. मला शीना मेसेज करत नसून कुणीतरी मला तिच्या मोबाइलवरून मेसेज करत असल्याचा असा संशय आला.
  • मग मी वरळी येथील इंद्राणीच्या घरी आलो. मी इंद्राणीचे घर ठोठावलं आणि इंद्राणीला शीना बाबत विचारलं. त्यावेळी एका महिलेने शेजारी विचारण्यास सांगितलं. मी शेजारचा दरवाजाकडे पाहिलं दरवाजा अर्धा उघडाच होता.
  • घरात पाहिलं तर कुणीतरी खोली क्रमांक 19 मध्ये होतं. मग मी पुन्हा खाली जाऊन सुरक्षा रक्षकाकडून चौकशी केली. मग मी वरळी पोलीस ठाण्यात गेलो.
  • पोलिसांना मी घडलेला प्रकार समजवून सांगितला. त्यानंतर माझ्यासोबत दोन पोलीस आले. त्यांच्यासोबत आम्ही प्लॅट नंबर 18 व 19 ची झडती घेतली.
  • त्यानंतर पोलिसांनी सुरक्षा रक्षकाकडून चौकशी केली. इमारत परिसरात येणाऱ्या जाणाऱ्याची नोंद केली जात असलेले रजिस्टर पाहिलं. त्यावेळी सुरक्षा रक्षकाने त्या रात्री तिघांना बाहेर जाताना पाहिलं.
  • मी वरळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेलो. त्यावेळी पोलिसांनी ती तिच्या आईसोबत गेली आहे काळजी करायचं कारण नाही येईल ती असे सांगितले. तसेच त्यांनी जर तुम्हाला तक्रार करायची असल्यास तुम्ही तिला शेवटी कुठे पाहिले वांद्रे येथे मग तेथे तक्रार होईल असे सांगितलं.
  • मी वांद्रे पोलिसात गेलो त्यांनीही मला तेच सांगितलं. त्यांनी मला अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास सांगितले.
  • मग मी माझ्या आईला देहरादूनला फोन केला आणि शीना बेपत्ता झाल्याची माहिती दिली. माझ्या आईने तिच्या शाळेतील मित्राशी चर्चा केली. त्या मित्राने परमबिर सिंग यांच्याशी बोलणी केली.
  • मग तिने मला परमबिर सिंग याचा नंबर मला पाठवला. मी त्यांना फोन केला त्यांनी मला मिसिंग तक्रार नोंदवण्यास सांगितले. पण मी मिसिंग तक्रार देण्यासाठी गेलो तेव्हा पोलिसांनी माझी तक्रार घेतली नाही.
  • माझी आई देहरादूनहून आली मग आम्ही अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेलो आणि मिसिंग तक्रार घेण्यास सांगितली. त्यांनी आमची माहिती पोलिस डायरीत नोंद केली.
  • त्यानंतर मी शीनाचे मित्र, वडील पीटर मुखर्जी यांना फोन करून शीनाबाबत विचारले. शीनाची शाळेची मैत्रिण संजना, प्रणय यांच्यासह शीनाच्या आजी आजोबांकडे चौकशी केली. मी इंद्राणीला फोन केला. मात्र इंद्राणी मला खोटी माहिती देत असल्याचे जाणवले.
  • मग मी इंद्राणीकडे शीनाबाबत विचारणा केली. त्यावेळी तिने मला शीना नागपूरला गेल्याचे सांगितले. तिथेही कुणाला तरी भेटून पुन्हा गुवाहटी जाणार असल्याचे सांगितले.
  • त्यानंतर ती यूएसएला गेल्याचे सांगितले. मात्र ते शक्य नव्हते कारण तिचा पासपोर्ट हा घरीच होता.
  • इंद्राणीने त्यावेळी मला हेही सांगितलं की, मी तिला वांद्रेमध्ये आली होती तिथे सोडले. त्याच वेळी मला इंद्राणी खोटं बोलत असल्याचे जाणवले. कारण ती वेळोवेळी शब्द बदलत होती.
  • त्यावेळी मला संशय आला की, काही तरी चुकीचं घडलेलं दिसतंय. त्यावेळी माझा मनात हाही विचार आला की, इंद्राणीने किंवा इतर कुणी तिची हत्या केली असावी.
  • मी माझा मोबाईल 2015 साली महाराष्ट्र पोलिसांकडे सुपूर्द केला. त्यात इंद्राणी व माझ्या वडिलांचे संभाषण आहे.
  • मी दरम्यान शीना काम करत असलेल्या ठिकाणी तिच्या वरिष्ठांकडे चौकशी केली. त्यांनी मला शीनाने माझ्याकडे राजीनामा टाकला असल्याचे सांगितले.
  • मी शीनाची चौकशी सर्वांकडे करत होतो. कुणीही मला खात्रीलायक उत्तर देत नव्हते. त्यानंतर शीनाच्या आजी आजोबांनी मला शीना परदेशात यूएसएमध्ये खूष असून तिचा पाठलाग थांबव, असे सांगितले.
हे सुद्धा वाचा

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.