राज कुंद्राच्या लॅपटॉपमधून डेटा मोठ्या प्रमाणात डिलीट, बँक खात्याच्या तपासणीतही महत्त्वाचे धागेदोरे

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार हा डेटा राज कुंद्राच्या सांगण्यावरून हटवला गेला. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याच्या काही दिवसानंतर हा डेटा डिलीट केला गेला.

राज कुंद्राच्या लॅपटॉपमधून डेटा मोठ्या प्रमाणात डिलीट, बँक खात्याच्या तपासणीतही महत्त्वाचे धागेदोरे
Raj kundra, Shilpa Shetty
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 7:34 AM

मुंबई : अश्लील चित्रपट निर्मिती रॅकेट प्रकरणात अटक झालेला उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) आणि रायन थॉर्पे (Ryan Thorpe) यांच्याकडून जो लॅपटॉप जप्त करण्यात आला होता, त्यामधून डेटा मोठ्या प्रमाणात डिलीट केल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या तपासणीत ही धक्कादायक माहिती समोर आली.

राज कुंद्राच्या सांगण्याने डेटा डिलीट?

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार हा डेटा राज कुंद्राच्या सांगण्यावरून हटवला गेला. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याच्या काही दिवसानंतर हा डेटा डिलीट केला गेला. या दोघांच्या लॅपटॉपवरुन जो 48 टीबी डेटा मिळाला आहे, त्यातून क्राईम ब्रँचला अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत.

परदेशी बँक खात्यात व्यवहार

राज कुंद्राच्या बँक खात्याच्या तपासणीत गुन्हे शाखेला महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुंद्राच्या बँक खात्यातून अनेक वेळा परदेशी बँक खात्यात मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार झाला आहे.

शिल्पाला रडू कोसळलं

दरम्यान, गुन्हे शाखेकडून शुक्रवारी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही तिच्या जुहूमधील बंगल्यात चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान शिल्पाला 3 ते 4 वेळा रडू कोसळल्याची माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली आहे. राज कुंद्रा यांनी अशा अश्लील चित्रपटांची निर्मिती केली आहे का? असा प्रश्न यावेळी गुन्हे शाखेनं शिल्पाला विचारले.

या संपूर्ण प्रकरणामुळे आपली प्रतिमा मलीन झाली आहे. बरेच ब्रँड आणि कॉन्ट्रॅक्टही आपल्या हातातून गेले आहेत, अशी खंत शिल्पाने चौकशी दरम्यान गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केल्याचीही माहिती मिळतेय. या दरम्यान गुन्हे शाखेनं व्हिआन इंडस्ट्रीजमधील भाग भांडवलाबाबत राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची एकत्र समोरासमोर 2 ते 3 वेळा चौकशी झाल्याचीही माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याला 19 जुलै रोजी अश्लील चित्रपट निर्मिती रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन (Kenrin) प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. तसेच, या व्हिडीओंचे शूटिंग भारतात करण्यात आले आणि त्यानंतर वी-ट्रान्सफर मार्गे यूकेला हस्तांतरित केले गेले

संबंधित बातम्या :

राज कुंद्राच्या सर्व कामांची माहिती आहे का? Shilpa Shetty ला पोलिसांनी विचारले 10 महत्त्वाचे प्रश्न

गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं? राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी

(Raj Kundra allegedly deleted data from laptop after getting booked in Obscene film racket)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.