Raj Kundra | राज कुंद्राच्या काळ्या पैशांचं रहस्य पंजाब नॅशनल बँकेतील खात्यात दडलंय?

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांचे पंजाब नॅशनल बँकेत जॉईंट अकाऊण्ट आहे. याशिवाय राज कुंद्राचे पीएनबीमध्ये एकट्याचेही खाते आहे. त्यामधून 2016 पासून कोणताही व्यवहार झालेला नाही.

Raj Kundra | राज कुंद्राच्या काळ्या पैशांचं रहस्य पंजाब नॅशनल बँकेतील खात्यात दडलंय?
उद्योगपती राज कुंद्रा, बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 12:56 PM

मुंबई : अश्लील चित्रपट निर्मिती रॅकेटमध्ये अटकेत असलेला उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याच्या काळ्या पैशाचे रहस्य ‘पीएनबी’तील खात्यात दडले आहे. राज कुंद्रा आणि त्याची पत्नी-अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांचे पंजाब नॅशनल बँकेत संयुक्त खाते आहे. राज कुंद्राच्या घरी सापडलेल्या गुप्त तिजोरीमध्ये आढळलेल्या कागदपत्रांच्या आधारे खुलासा झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पंजाब नॅशनल बँकेत खाते

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांचे पंजाब नॅशनल बँकेत जॉईंट अकाऊण्ट आहे. याशिवाय राज कुंद्राचे पीएनबीमध्ये एकट्याचेही खाते आहे. त्यामधून 2016 पासून कोणताही व्यवहार झालेला नाही. प्लेसमेंट लेअरिंग आणि इंटिग्रेशन अंतर्गत इतर खात्यात पैसे लपवले गेल्याचा संशय आहे. राज कुंद्राच्या बँक खात्याच्या तपास गुन्हे शाखेची 4 सदस्यांची टीम करत आहे. कोरोना काळात राज कुंद्राची कमाई क्रिप्टोकरन्सीमध्ये झाली आहे

अश्लील चित्रपटांच्या सर्व स्क्रिप्ट हिंदीमध्ये

दरम्यान, राज कुंद्राच्या व्हियान आणि जेएल स्ट्रीम अ‍ॅपच्या कार्यालयावर पोलिसांनी छापे टाकले, तेव्हा काही स्क्रिप्ट सापडल्या. त्याच्या आधारावर अश्लील चित्रपटांचे चित्रिकरण केलं जाणार होतं, अशीही माहिती समोर आली आहे. जवळपास सर्वच स्क्रिप्ट हिंदीत होत्या. त्या स्क्रिप्ट वाचल्यानंतर पुन्हा अश्लील चित्रपट बनवण्याची तयारी केली जात होती. पण राज कुंद्राला बेड्या ठोकल्यानंतर सर्व स्क्रिप्ट ऑफिसमध्ये लपवून ठेवण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे आता गुन्हे शाखेच्या रडारवर राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे संयुक्त बँक खाते देखील आहेत. या खात्याद्वारे अनेक परदेशी व्यवहार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शिल्पा शेट्टीच्या मोबाईलची क्लोनिंग

अटक झालेले आरोपी आणि कंपनीच्या कर्मचार्‍यांशी शिल्पाने काही बातचित किंवा चॅट केले आहे का याची प्रॉपर्टी सेलला माहिती घ्यायची आहे. त्यामुळे मुंबई गुन्हे शाखा आता या प्रकरणी शिल्पा शेट्टीच्या मोबाईलची देखील क्लोनिंग करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गुन्हे शाखेला कुंद्राच्या घरातील मिस्ट्री वॉलच्या कपाटातून काही करारपत्र मिळाले आहेत. त्यामुळे गुन्हे शाखा शिल्पाची पुन्हा चौकशी करु शकते. तसेच शिल्पाच्या बँक खात्याची देखील चौकशी सुरु आहे. शिल्पाला कंपनीच्या खात्यातून किती पैसे मिळाले, शिल्पाच्या खात्यात किती पैसे गेले, याची चौकशी केली जाईल.

संबंधित बातम्या :

अश्लील चित्रपटाच्या हिंदी स्क्रिप्ट मिळाल्या, तपासात अनेक खुलासे, राज कुंद्राच्या अडचणीत वाढ

गुन्हे शाखेच्या प्रश्नांची उत्तरे देताना शिल्पा शेट्टी अस्वस्थ, ‘हॉटशॉट’बद्दल बोलताना म्हणाली ‘ते व्हिडीओ अश्लील नव्हते’

Raj Kundra Punjab National Bank PNB account may reveal about black money

Non Stop LIVE Update
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.