Rahul Jain : बॉलीवूड गायक राहुल जैनविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल, ‘कॉस्च्युम स्टायलिस्ट’ने केला आरोप

पीडित महिला 11 ऑगस्ट रोजी जैनच्या फ्लॅटवर गेली होती. सामान दाखवण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला आपल्या बेडरूममध्ये नेले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.

Rahul Jain : बॉलीवूड गायक राहुल जैनविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल, 'कॉस्च्युम स्टायलिस्ट'ने केला आरोप
बॉलीवूड गायक राहुल जैनविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 11:11 PM

मुंबई : बॉलीवूड गायक-संगीतकार राहुल जैन (Rahul Jain) याच्याविरुद्ध बलात्कारा (Rape)चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिला ‘कॉस्च्युम स्टायलिस्ट’ने जैन विरोधात घरी बोलावून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार ओशिवरा पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. राहुल जैन याने हे आरोप फेटाळले आहेत. हे आरोप “खोटे आणि निराधार” असल्याचे राहुलने म्हटले आहे. तक्रारदाराने ओशिवरा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या आपल्या जबानीत म्हटले आहे की, जैन याने महिलेशी इन्स्टाग्रामवर संपर्क साधला आणि तिच्या कामाचे कौतुक केले. यानंतर आरोपीने फिर्यादीला त्याच्या अंधेरी येथील फ्लॅटवर बोलावले आणि तिच्याशी गैरकृत्य केले, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

पुरावे नष्ट केल्याचाही आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला 11 ऑगस्ट रोजी जैनच्या फ्लॅटवर गेली होती. सामान दाखवण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला आपल्या बेडरूममध्ये नेले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. ही महिला ‘कॉस्च्युम स्टायलिस्ट’ म्हणून स्वतंत्र काम करते. तिने विरोध केल्यावर जैनने तिला मारहाण करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 323 आणि 506 अंतर्गत जैनविरोधात एफआयआर नोंदवला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

गायकाने ओळखण्यास नकार दिला

दरम्यान, जैनने त्याच्यावरील आरोप नाकारले असून, महिलेला आपण ओळखत नसल्याचे सांगितले. महिलेचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे त्याने म्हटले आहे. यापूर्वीही एका महिलेने माझ्यावर असेच आरोप केले होते, पण मला न्याय मिळाला. ही महिला तिची साथीदार असू शकते, असे जैन म्हणाला. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बॉलिवूड गीतकार आणि लेखकाने राहुल जैन विरोधात बलात्कार, जबरदस्ती गर्भपात आणि फसवणूक यासह विविध आरोपांखाली एफआयआर दाखल केला होता. (Rape case filed against Bollywood singer Rahul Jain)

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.