डोंबिवलीत धक्कादायक घटना, भर चौकात रिक्षा चालकाकडून रिक्षा चालकाची हत्या, शहरात खळबळ
डोंबिवलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवलीत एका रिक्षा चालकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका रिक्षा चालकानेच दुसऱ्या रिक्षा चालकाची भर चौकात हत्या केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कल्याण आणि डोंबिवली या शहरांमधील गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नाही. विशेष म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांचा कोणत्याच प्रकारचा धाक वाटत नाही. ते सर्रासपणे मनाला पटेल ते कृत्य करतात. त्यांना कशाचीच भीती वाटत नाही. पण गुन्हेगारांच्या अशा प्रकारच्या कृत्यांमुळे सर्वसामान्य जनता भयभीत होते. सामान्य नागरीक दहशतीखाली राहतात. आतादेखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटना अतिशय थरकाप उडवणारी अशीच आहे. कारण भर वर्दळीच्या ठिकाणी चौकात एका रिक्षा चालकाने दुसऱ्या रिक्षा चालकाची निर्घृणपणे हत्या केली आहे. संबंधित घटना ही खंबालपाडा परिसरात घडली आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आङे.
डोंबिवली पूर्वेतील या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहर सुन्न झाली आहे. काही रिक्षा चालक कशाप्रकारे दादागिरी करतात याचं हे उदाहरण आहे. डोंबिवली भोईरवाडी खांबलपाडा परिसरात भर चौकात एका रिक्षा चालकाने दुसऱ्या रिक्षा चालकाची हत्या केली. अश्विन कांबळे असं मयत रिक्षा चालकाचे नाव आहे. तर हत्या करणाऱ्या आरोपी रिक्षा चालकाचं नाव सुनील राठोड असं आहे. त्याने अश्विन कांबळे यांच्या डोक्यात रॉड घालून हत्या केली आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा स्टँडवर रिक्षा लावण्याच्या वादातून आरोपी सुनील राठोड याने अश्विन कांबळे यांची हत्या केली आहे. आरोपीने भर चौकात अश्विन कांबळे या रिक्षा चालकाच्या डोक्यात रॉड घातून हत्या केली. या हत्येमुळे कल्याण आणि डोंबिवली शहरातील गुन्हेगारी किती फोफावली आहे याचा् पुन्हा प्रत्यय आला आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी एका तरुणाची कल्याण पूर्वीतील मलंगगड रोडवर एका बँकेच्या बाहेर असणाऱ्या चौकात भर दिवसा हत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर डोंबिवलीच्या खंबालपाडा परिसरात भर चौकात हत्येची घटना समोर आली आहे. दरम्यान, टिळक नगर पोलीस घटनास्थळी दाखल होत असून, त्यांनी याप्रकरणी तपासाला सुरूवात केली आहे.