कल्याणमधील संतापजनक प्रकार! क्लासवरून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीची रिक्षा चालकाकडून छेडछाड

महाराष्ट्रात अल्पवयीन मुलीदेखील सुरक्षित नाहीत. कारण अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढलेल्या असताना आता कल्याणमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत संतापजनक घटना घडली आहे. एका रिक्षा चालकाने विद्यार्थिनीची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. आरोपी रिक्षा चालकाने पीडितेला अर्वाच्य शिवीगाळही केली. या संतापजनक घटनेनंतर आरोपी रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

कल्याणमधील संतापजनक प्रकार! क्लासवरून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीची रिक्षा चालकाकडून छेडछाड
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 9:17 PM

कल्याणमधून धक्कादायक घटना समोर येत आहे. क्लासवरून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीची रिक्षा चालकाकडून छेडछाड करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे धावत्या रिक्षातून उडी मारत विद्यार्थिनीने पळ काढल्यामुळे ती बचावली आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे. विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्या रिक्षा चालकाला कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती मिळत आहे.

कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्लासवरून रिक्षाने घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनींची रिक्षा चालकाने छेड काढली. घाबरून या विद्यार्थिनीने रिक्षातून उडी मारत घरच्या दिशेने पळ काढला. मात्र या मुजोर रिक्षा चालकाने तिचा पाठलाग करत या अल्पवयीन विद्यार्थिनीला शिवीगाळ केली. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रिक्षाचालक गोपाळ मुदलीयार याला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

घटना कल्याण पूर्व परिसरातील असून, विद्यार्थिनीने क्लास संपल्यानंतर घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षात बसल्यानंतर रिक्षाचालकाने मुलीकडे तिचा नंबर मागितला आणि तिच्याशी अश्लील बोलण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीने रिक्षा थांबवण्याची विनंती केली, मात्र चालकाने रिक्षा भरधाव चालवली. समोर अचानक दुचाकी आल्याने रिक्षा मंद झाल्यावर, विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखत रिक्षातून उडी मारली आणि घरी पळाली.

मात्र, रिक्षाचालकाने तिचा पाठलाग करत तिला धमकावले आणि शिवीगाळ केली. रिक्षा चालकाने मुलीचा घरापर्यंत पाठलाग करत तिला गाठले. तिला शिवीगाळ केली. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गोपाळ मुदलियार या रिक्षा चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. कोळसेवाडी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.