Child Rescued : आरपीएफ मध्य रेल्वेने ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत 4 महिन्यांत 504 मुलांची केली सुटका

गेल्या वर्षी म्हणजे 2021 च्या जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मध्य रेल्वे आरपीएफने शासकीय रेल्वे पोलीस (GRP) आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने 603 मुले आणि 368 मुली अशा एकूण 971 मुलांची सुटका केली आहे. तसेच रेल्वेने अलीकडेच असोसिएशन फॉर व्हॉलंटरी ॲक्शन (AVA) सोबत देशातील रेल्वेमार्गे होणारी मानवी तस्करी समाप्त करण्याच्या प्रकल्पावर काम करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.

Child Rescued : आरपीएफ मध्य रेल्वेने ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत 4 महिन्यांत 504 मुलांची केली सुटका
महसूल, पार्सल कमाई आणि तिकीट तपासणीमध्ये मध्य रेल्वेची उत्कृष्ठ कामगिरीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 11:51 PM

मुंबई : काही कारणामुळे घर सोडून पळालेल्या मुलांची रेल्वे पोलिस आणि रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने सुटका करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) शासकीय रेल्वे पोलीस (GRP) मध्य रेल्वेतील रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” (Operation Nanhe Farishte) अंतर्गत गेल्या 4 महिन्यांत म्हणजे जानेवारी 2022 ते एप्रिल 2022 या कालावधीत 504 मुलांची सुटका (Rescued) केली आहे. यामध्ये 330 मुले आणि 174 मुलींचा समावेश आहे आणि चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन झाले आहे.

रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे रेल्वे मंत्रालयाने मुलांच्या सुटकेसाठी जारी केलेल्या प्रमाणित कार्यप्रणालीद्वारे अनिवार्य केलेल्या जबाबदारीचे पालन करण्यात येत आहे आणि “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत हरवलेल्या/घरातून पळून आलेल्या मुलांच्या सुटकेसाठी इतर भागधारकांसोबत काम करत आहे. यातील काही मुले भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगल्या आयुष्याच्या किंवा शहरातील ग्लॅमरच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्टेशनवर येणारी ही मुले प्रशिक्षित आरपीएफ कर्मचार्‍यांना सापडतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक मनापासून कृतज्ञता व्यक्त करतात.

जानेवारी ते एप्रिल 2022 मध्ये 285 प्रकरणांची नोंद

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 2022 मध्ये जानेवारी ते एप्रिल या कालावधीत बालकांच्या सुटकेची सर्वाधिक 285 प्रकरणे नोंदवली गेली, ज्यात 206 मुले आणि 79 मुलींचा समावेश आहे. पुणे विभागात 50 मुले आणि 21 मुली अशा एकूण 71 मुलांची सुटका केल्याची नोंद करण्यात आली आहेत. भुसावळ विभागात बालकांच्या सुटकेच्या 92 गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यात 47 मुले आणि 45 मुलींचा समावेश आहे. नागपूर विभागात बालकांच्या सुटकेच्या 32 प्रकरणांची नोंद झाली असून त्यात 12 मुले आणि 20 मुलींचा समावेश आहे. सोलापूर विभागात बालकांच्या सुटकेच्या 24 गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यात 15 मुले आणि 9 मुलींचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

गतवर्षी 971 मुलांची सुटका

गेल्या वर्षी म्हणजे 2021 च्या जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मध्य रेल्वे आरपीएफने शासकीय रेल्वे पोलीस (GRP) आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने 603 मुले आणि 368 मुली अशा एकूण 971 मुलांची सुटका केली आहे. तसेच रेल्वेने अलीकडेच असोसिएशन फॉर व्हॉलंटरी ॲक्शन (AVA) सोबत देशातील रेल्वेमार्गे होणारी मानवी तस्करी समाप्त करण्याच्या प्रकल्पावर काम करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. ही संघटना ‘बचपन बचाओ’ आंदोलन म्हणूनही ओळखली जाते, जी नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या चिल्ड्रन फाऊंडेशनशी संबंधित आहे. आरपीएफने “ऑपरेशन AAHT” (Action Against Human Trafficking- मानवी तस्करी विरुद्ध कृती) सुरु केले आहे आणि रेल्वेद्वारे मानवी तस्करी विरुद्ध कठोर कारवाई केली आहे. तसेच संभाव्य मानवी तस्करीच्या बळींना तस्करांच्या तावडीतून सोडवत आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.