सचिन वाझे याची चांदीवाल आयोगासमोर सुनावणी, उलट तपासणी उद्या होणार
माझे दोन प्रतिज्ञापत्र हेच माझे जबाब समजावेत आणि 29 जुलै रोजी आपण जो अर्ज सादर केला आहे तो काय ते समजण्यात यावा. आपला या आयोगाच्या कामकाजावर विश्वास आहे. आपण या प्रकरणातील छोटा प्यादा आहोत, असं वाझेने सांगितलं.
मुंबई : बडतर्फ पोलीस अधिकारी एपीआय सचिन वाझे याची न्या. चांदीवाल आयोगात आज साक्ष पार पडली. यावेळी आपले प्रतिज्ञापत्र हेच साक्ष समजावी. त्याचप्रमाणे आयोगाच्या कामकाजावर आपला विश्वास असल्याचंही सचिन वाझे याने आयोगाला सांगितलं. तर परमबीर सिंग याने काही कागदपत्रे खोटी सादर केली आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अनिल देशमुख यांच्या वकिलांनी केली.
उद्या उलट तपासणी होणार
न्या चांदीवाल आयोगासमोर आज बडतर्फ एपीआय सचिन वाझे याला साक्षीसाठी 12 वाजता सचिन वाझे आयोगा समोर आणण्यात आलं. यावेळी त्याला काही बोलायचं आहे का? काही अर्ज द्यायचा आहे का? असं न्या चांदीवाल यांनी विचारलं. यावेळी 25 जून आणि 15 जुलै 2021रोजी आपण प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत. त्याचप्रमाणे 29 जुलै 21 रोजी एक अर्ज केला आहे. माझे दोन प्रतिज्ञापत्र हेच माझे जबाब समजावेत आणि 29 जुलै रोजी आपण जो अर्ज सादर केला आहे तो काय ते समजण्यात यावा. आपला या आयोगाच्या कामकाजावर विश्वास आहे. आपण या प्रकरणातील छोटा प्यादा आहोत, असं वाझेने सांगितलं. कोर्टाने त्याचं म्हणणं मान्य करून त्याची उलट तपासणी इतर पक्षाला करायची असल्यास त्याबाबत उद्या दुपारी 2 वाजता सुनावणी ठेवण्यात आली आहे.
परमबीर सिंग यांचा आयोगाच्या कामकाजाला विरोध
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आयोगाच्या कामकाजाला विरोध केला आहे. आयोग बेकायदेशीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र ,याबाबत त्यांच्या बाजूने कोणताही आदेश न दिल्याने परमबीर सिग यांना कोर्टाच्या कामकाजाला समोर जावं लागत आहे. याबाबत त्यांनी आपला पॉवर ऑफ अटर्नी कोर्टाला सादर केला आहे. तर त्यांनी वेळेत प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने त्यांना आयोगाने दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम ही त्यांनी चेकने आयोगाला भरली आहे. मात्र, आयोगाकडे परमबीर यांनी सादर केलेली कागदपत्र यावरील सही आणि चेक यावरील सही ही वेगळी आहे. यावरून परमबीर सिंग यांनी सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचा संशय आहे, असा मुद्दा अनिल देशमुख यांच्या वकिलाने उपस्थित केला.
परमबीर सिंग यांनी स्वतः हजर न राहता महेश पांचाळ नावाच्या व्यक्तीला मुखत्यारपत्र देऊन आयोगासमोर सादर केलं आहे. प्रत्यक्षात पांचाळ यांना याबाबतची काही माहिती आहे. त्यांची कायदेशीर वैधता तपासण्यासाठी त्यांना आयोगा समोर बोलवावं, अशी मागणी संजीव पालांडे यांचे वकील शेखर जगताप यांनी आयोगाकडे केली. न्या. चांदीवाल आयोगात उद्या सचिन वाझे याची महत्वाची अशी उलट तपासणी होणार आहे. यावेळी 100 कोटींच्या वसुली प्रकरणात आता त्याची भूमिका काय आहे हे स्पष्ट होणार आहे. (Sachin Waze to be heard before Chandiwal Commission)
इतर बातम्या
एटीएममध्ये बिनधास्त धुसला अन् मशीन फोडू लागला, सायरन वाजता पळाला, औरंगाबादमध्ये एकजण ताब्यात
खिडकीतून बेडरुममध्ये डोकावणे रिक्षा चालकाच्या बेतले जीवावर, धारदार शस्त्राने वार करुन हत्या