मुंबई : मनोरंजन विश्वासाठी शुक्रवारचा दिवस अतिशय दुःखद होता. अंधेरी एका मॉडेलने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका कलाकाराने अतिशय धक्कादायकरित्या या जगाचा निरोप घेतला आहे. बॉलीवूड किंग सलमान खानचा बॉडी डबल (Salman Khan Body Double) सागर पांडेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Death by heart attack) झाल्याची घटना घडली आहे. जिममध्ये वर्कआऊट (Workout in Gym) करत असतानाच सागरचे दुःखद निधन झाले.
सागर पांडे आज दुपारी 1 च्या सुमारास जिममध्ये वर्कआऊट करताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर जिममधील ट्रेनरने त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र त्यांचा आधीच मृत्यू झाला. ते 50 वर्षांचे होते. विशेष म्हणजे सलमानप्रमाणे सागर पांडे अद्याप बॅचलर होते.
सागर पांडेंनी सलमान खानच्या जवळपास 50 चित्रपटांमध्ये त्याचा बॉडी डबल म्हणून केले आहे. हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिटही झाले होते. ट्यूबलाईट, दबंग, दबंग 2, बजरंगी भाईजान, प्रेम रतन धन पायो, तसेच टीव्ही शो बिग बॉसमध्ये त्यांनी सलमानचा बॉडी डबल म्हणून काम केले.
सागर पांडे मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. बॉलीवूडमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी ते मुंबईत आले. मात्र ते अभिनेते होऊ शकले नाही, म्हणून ते बॉडी डबल म्हणून काम करु लागले. तसेच पांडे स्टेज शो ही करायचे. देश-विदेशातील शो मध्ये परफॉर्म करायचे.
कोरोना काळात जेव्हा ते आर्थिक अडचणीत होते. तेव्हा सलमान खान त्यांना खर्चासाठी नियमित पैसे पाठवायचा.