मोठी बातमी! एनसीबी विजलन्स पथकासमोर समीर वानखेडेंची उद्या चौकशी, लवकरच निकालाची शक्यता
Latest Update of Sameer Wankhede : याप्रकरणाची गंभीर दखल घेत एनसीबी (NCB) दक्षता पथकाकडून घेण्यात आली. याप्रकरणी एनसीबी दक्षता पथक चौकशी करतंय. याप्रकरणाचा तपास सध्या शेवटच्या टप्प्यात आलाय.
मुंबई : मुंबई एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीन वानखेडे (Sameer Wankhede) यांना चौकशीसाठी दिल्लीत जावं लागणार आहे. त्यांनी 13 फेब्रुवारी म्हणजे उद्या चौकशी होणार आहे. एनसीबी विजिलन्स पथकासमोर समीर वाखेडे यांची चौकशी केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला करण्यात आलेल्या अटकेच्या प्रकरणानंतर एनसीबीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यानंतर याप्रकरणाची गंभीर दखल घेत एनसीबी (NCB) दक्षता पथकाकडून घेण्यात आली. याप्रकरणी एनसीबी दक्षता पथक चौकशी करतंय. याप्रकरणाचा तपास सध्या शेवटच्या टप्प्यात आलाय. आता उद्या होणाऱ्या समीर वानखेडे यांच्या चौकशीतून नेमकी काय माहिती या पथकाला मिळते, हे पाहणं महत्त्वाचंय. दिल्ली एनसीबीच्या दक्षता पथकाने एनसीबीच्या तीन अधिकाऱ्यांना चौकशीसाठी मुंबईहून दिल्लीला (Delhi) बोलावले आहे. आशिष रंजन प्रसाद, व्हीव्ही सिंग आणि मुंबई एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना चौकशीत सहभागी होण्यासाठी बोलावण्यात आलं आहे.
काहींची आज, तर काहींची उद्या चौकशी
दक्षता पथकाने मुंबई एनसीबीचे अधिकारी व्हीव्ही सिंग यांना 12 फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. तर मुंबई NCB चे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे 13 फेब्रुवारीला हजर होणार आहेत. तर शुक्रवारी म्हणजे 11 फेब्रुवारी रोजी मुंबई एनसीबीचे अधिकारी आशिष रंजन हे दक्षता पथकासमोर हजर झाले होते. अनेक तास दक्षता पथकाने त्यांची चौकशी केली.
NCB vigilance probe in drug bust on cruise liner near completion. Former Mumbai NCB zonal director Sameer Wankhede has been called for questioning in Delhi: Narcotics Control Bureau
— ANI (@ANI) February 11, 2022
कुठून झाली होती प्रकरणाला सुरुवात?
आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं होतं. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं साईल यांचा दावा आहे. आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे. दरम्यान, तेव्हापासून आर्यन खान प्रकरणावरुन भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.
सुरुवात सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या आरोपांवरुन अखेर प्रभाकर साईल यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची एनसीबीकडूनही गंभीर दखल घेण्यात आली. डीडीजी एनसीबी ज्ञानेश्वर सिंह याप्रकरणी तिघांची नेमणूक करुन याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि चौकशीअंती कुणी दोषी आढळलं तर कारवाई केली जाईल, असं म्हटलंय. सध्या सुरु असलेल्या दक्षता समितीचा तपास हा ज्ञानेश्वर सिंह यांच्याच नेतृत्त्वाखाली सुरु आहे. दक्षता पथकाचे प्रमुख ज्ञानेश्वर सिंह यांनी स्वत: दोनदा मुंबईत तपास केला असून अनेकांचे जबाबही नोंदवलेत.
कोणंय प्रभाकर साईल?
प्रभाकर राघोजी साईल (वय 40) हे अंधेरी पूर्वेला येथे राहतात. ते केपी अर्थात किरण प्रकाश गोसावी यांचे बॉडीगार्ड आहेत, असा दावा त्यांनी केला होता. 22 जुलै 2021 पासून गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून ते काम करत आहेत. 30 जुलै 2021 रोजी तो गोसावीच्या ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये पहिल्यांदाच गेले. त्यावेळी इम्पोर्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय असल्याचं गोसावीने त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर गोसावीने साईलला बॉडीगॉर्ड म्हणून नेमलं होतं. एनसीबी पंच असलेले प्रभाकर साईल यांनी एनसीबीकडून ड्रग्जप्रकरणी केलेल्या कारवायांमध्ये तोडपाणी होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आणून एकच खळबळ उडवून दिली होती.
संबंधित बातम्या :
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश, मोहित कंबोज यांचा दावा
सुशांत सिंह राजपूतच्या ड्रग तस्कर शेजाऱ्याला एनसीबीकडून अटक, तब्बल 8 महिन्यांनंतर एसीबीच्या जाळ्यात
समीर वानखेडेंची बदली, NCB च्या विभागीय संचालकपदी कोणाची वर्णी?