Mumbai Crime: बादशाह मलिकला 24 डिसेंबरपर्यंत ईडी कोठडी, मनी लाँड्रिंग प्रकरणी कारवाई
बादशाह मलिकला सोमवारी ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी करण्यात आली. तसेच मलिकच्या घरावर आणि कार्यालयावरही छापे मारण्यात आले होते. त्यानंतर त्याला ईडी कार्यालयात आणून रात्रभर त्याची चौकशी करण्यात आली.
मुंबई : रक्त चंदनच्या तस्करी प्रकरणात अटक आरोपी बादशाह मलिकला आज पीएमएलए कोर्टाने 24 डिसेंबर पर्यंत ईडी कोठडीमध्ये पाठविण्याचा आदेश दिला आहे. बादशाह मलिक याला कुर्ला येथून आज सकाळी ईडीने अटक केली होती. अटक केल्यानंतर आज रिमांडसाठी त्याला सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला तीन दिवसाची ईडी कोठडी सुनावली.
2015 मध्ये रक्तचंदन तस्करी प्रकरणी झाली होती कारवाई
डीआरआयने वर्ष 2015 मध्ये एका रक्तचंदन तस्करी प्रकरणात गुह्या दाखल केला होता. सदर प्रकरणाच्या चौकशी दरम्यान चंदन तस्कर बादशाह मलिकचे नाव समोर आले होते. त्यामुळे त्याला डीआरआयने अटक केली होती. चौकशीत डीआरआयला माहिती मिळाली की परदेशात पाठविण्यात आलेल्या रक्त चंदनच्या कंसाईनमेन्टच्या बदल्यात आरोपीच्या अकाऊंटमध्ये 3.12 कोटी ट्रान्सफर झाले होते. अटकेनंतर काही दिवसांनी बादशाह मलिक जामिनावर सुटला होता.
हवाला आणि मनी लाँड्रिंगमुळे मलिक ईडीच्या रडारवर
याप्रकरणी अधिक चौकशी केली असता 2015 पूर्वी बादशाहने 80 कंसायनमेंट परदेशात पाठविल्याचे समोर आले होते. त्यातून त्याला जवळपास 48 कोटी हवाला आणि मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून मिळाले होते. यामुळे बादशाह मलिक आणि त्याची कंपनी आता ईडीच्या रडारवर आली आहे. मनी लाँड्रिंग आणि हवाला प्रकरणी ईडीने बादशाह मलिकला आज अटक करीत रिमांडसाठी सत्र न्यायालयात हजर केले. ईडी तर्फे पीएमएलए कोर्टात असं सांगण्यात आलं की वरील पैसे बादशाह मलिक याने एका बनावट एक्सपोर्ट कंपनी एम्पायर इंडियाच्या माध्यमातून रिसिव्ह केले होते.
डीआरआयच्या या केसमध्ये ईडीने पीएमएलए अंतर्गत एसीआयर ( ECIR ) दाखल केला आणि मनीलाँड्रिंग अंतर्गत चौकशी सुरू केली. मात्र हे पैसे कुठून आले ? कशा प्रकारे ट्रान्झेक्शन झाले ? कोणी केले ? ह्या चंदन तस्करीमध्ये कोणाची भूमिका आहे? ह्या सर्व प्रकरणाची चौकशी ईडी करणार आहे.
मलिकच्या घरी आणि कार्यालयावर ईडीची धाड
बादशाह मलिकला सोमवारी ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी करण्यात आली. तसेच मलिकच्या घरावर आणि कार्यालयावरही छापे मारण्यात आले होते. त्यानंतर त्याला ईडी कार्यालयात आणून रात्रभर त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पहाटे त्याला अटक करण्यात आली. (Sandalwood smuggler Badshah Malik remanded in police custody till December 24)
इतर बातम्या
Crime | तृतीयपंथीयांचा रास्तारोको! 24 तासांत दोघां तृतीयपंथीयांच्या हत्येमुळे जाळपोळ, तोडफोड
Pune crime |’हफ्ता दे’ म्हणत दुकानदाराला मारहाण करणाऱ्या गुंडांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या